स्टेडियमच्या जागेवर वाहनतळास जिल्हा परिषदेचादेखील विरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : ’स्मार्ट सिटी’अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या स्टेडियमबाबत जिल्हा परिषदेला विश्‍वासात न घेताच महापालिकेने सदर निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करीत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व क्रीडा संघटनांनी जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर अध्यक्षांनी आपण खेळाडूंबरोबर असल्याचे सांगितले.
 
महापालिकेने अशोकस्तंभ ते गडकरी चौकापर्यंत स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याची घोषणा केलेली आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याचे नियोजन केले आहे. या निर्णयास शहरातील क्रीडा संघटना आणि खेळाडूंनी तीव्र विरोध दर्शविला आहे. संघटनांनी महापालिकेच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचे शिवाजी स्टेडियम असून, ३० वर्षांच्या कराराने मैदान क्रीडा कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेले आहे. त्यामुळे या मैदानावर स्थानिक खेळाडू सराव करीत असतात, तसेच विविध प्रकारच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धादेखील होत असतात. महापालिकेने स्मार्ट रस्त्याचे नियोजन करताना या मैदानावर मात्र अंडरग्राऊंड दोन मजली वाहनतळाचे नियोजन केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@