श्री स्वामी समर्थ जागतिक कृषी महोत्सवाला २५ एप्रिलपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २५ ते २९ एप्रिल दरम्यान ७ व्या जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या अभियानातून शेतकर्‍राच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पण याबरोबरच कृषी दिंडी, वधू-वर परिचर मेळावा, रुवा महोत्सव सरपंच-ग्रामसेवक मांदिराळीसह विविध चर्चासत्रांचा अंतर्भावही या महोत्सवात असल्याची माहिती आयोजक आबासाहेब मोरे यांनी दिली.
 
दरम्यान काल मंगळवारी डोंगरे वसतिगृह मैदानावर कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन व मंडप उभारणीस प्रारंभ करण्यात आला. प्रसंगी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
 
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाअंतर्गत कार्ररत श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सातत्याने कृषी विकास व शेतकरी उत्कर्षासाठी, शेतकर्‍रांना समर्थ बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. ग्राम अभियानाचा एक भाग म्हणून २०१३ पासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी शेतकरी, संशोधक, विद्यार्थी, विक्रेते, सेवाभावी संस्था व नागरिकांचा या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. २०१७ मध्ये जवळपास साडेचार लाख शेतकर्‍रांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला. मोफत प्रवेश असल्याने यावर्षीसुद्धा विक्रमी संख्येने लोक या ठिकाणी भेट देणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. विविध उपक्रम व विक्रेते यांच्यासाठी यावर्षी ४०० स्टॉल्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
 
उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
दि. २५ एप्रिल रोजी सकाळी रामकुंड ते डोंगरे वसतिगृहापर्यंत कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गुरुमाऊली प.पू. अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी अनेक केंद्रीय राज्याचे मंत्री, स्थानिक खासदार, आमदार, जि.प. अध्यक्ष, महापौरांसह मनपा आयुक्त व अनेक वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी हजर राहणार आहेत. याच दिवशी नैसर्गिक शेतीवर चर्चासत्र होईल. २५ ते २९ एप्रिल या काळात देशी बी-बियाणे, पर्यावरण, दुर्गसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, गौसंवर्धन, कृषी क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग, जोडधंदे अशा विविध विषयांवर विचारमंथन होईल.
कृषी माऊली पुरस्कार
या महोत्सवात शेतकरी वधू-वर मेळावा, युवा महोत्सव, सरपंच, ग्रामसेवक मेळावा, कृषी माऊली पुरस्कार असे विविध उपक्रम खास आकर्षण ठरणार आहेत. नैसर्गिक शेती, देशी बियाणे, गोसेवा-गो संवर्धन, दुग्ध व्यवसाय, कृषी जोड व्यवसाय, विविध माध्यमांतून शेतकरी विकासाचे लिखाण, कृषी शासकीय सेवा अशा विविध विषयांमध्ये आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्ती-संस्थांचा ‘कृषीमाऊली पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार असल्याचेही आबासाहेब मोरे यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संशोधक वृत्ती जोपासणाऱ्या विद्यार्थी व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘कृषी माऊली पुरस्कार’ बरोबरच त्यांच्या संशोधनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@