प्रमोद बापट यांना ’गोपालकुसुम’ तर मामासाहेब घुमरे यांना ’कमलकांता’ पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |

 
 
 
मुंबई : प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून कार्य करणार्‍यांसाठी सरोजिनी अकॅडमीतर्फे ’गोपालकुसुम’ आणि ’कमलकांता’ हे विशेष पुरस्कार देण्यात येतात. यंदा २०१८ सालचे सरोजिनी अकॅडमीच्या वतीने दिला जाणारा ’गोपालकुसुम संस्कृति’ पुरस्कार रा. स्व. संघाच्या पश्चिमक्षेत्राचे प्रचारप्रमुख प्रमोद बापट यांना जाहीर झाला आहे. रु. २१ हजार अशी या पुरस्काराची रक्कमआहे. प्रमोद बापट हे निरलसपणे देशसेवा-समाजसेवा-संस्कृतीसंवर्धनाचे कार्य करत असून उत्कृष्ट वक्ते आणि संस्कार भारतीचे मार्गदर्शक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. लवकरच प्रमोद बापट यांना मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
 
सरोजिनी अकॅडमीतर्फे दिले जाणारा ’कमलकांता’ पुरस्कार यंदा नागपूरनिवासी दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. आणीबाणीच्या काळात ’नागपूर तरुण भारत’वर इंदिरा गांधी सरकारने वक्रदृष्टी केल्यानंतर दि. भा. घुमरे यांनी समर्थपणे आपले वर्तमानपत्र लोकांतात नेले. त्यांनी ’नरकेसरी बॅ. अभ्यंकर यांचे चरित्र’, ’चिरंतनाचे योगी विनोबा’, ’आन्हिक’, ’शंखशिंपले’, ’विरंगुळा’, ’बकुळीची फुले’ अशी कित्येक पुस्तके लिहिली असून त्यांचे संपादकीय लिखाण व भाषणेही स्मरणीय आहेत. मामासाहेब घुमरे यांच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्यांना नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन ’कमलकांता’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
 
’गोपालकुसुम’ आणि ’कमलकांता’ या पुरस्कारांसाठी सरोजिनी अकॅडमीच्या पुरस्कार समितीकडून नावांची निवड केली जाते. या पुरस्कार समितीमध्ये डॉ. दिलीप डबीर, डॉ. स्मिता कुळकर्णी, डॉ. अनुराधा पोतदार, मिलिंद करमरकर, वंदना शिंदे, सुनील काळकर व प्रा. राजश्री पाटील यांचा समावेश होता.
@@AUTHORINFO_V1@@