अमित शहा यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा कट - रवि शंकर प्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना बदनाम करण्यासाठी न्यायमूर्ती लोया यांचा खटला दाखल करण्यात आला, असा आरोप भारताचे कायदा व न्याय, माहिती तंत्रज्ञान मंत्री, रवि शंकर प्रसाद यांनी आज केला.
 
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी याचिका एस.आय.टी. कॉंग्रेस नेते तहसिन पूनावाला, बॉम्बे लॉयर्स असोसिएशन तर्फे दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा निर्वाळा दिला असून हि याचिका फेटाळली. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रवि शंकर प्रसाद बोलत होते. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटीया आणि संबीत पात्रा हेदेखील उपस्थित होते.
 
यावेळी रवि शंकर प्रसाद पुढे म्हणाले की, हा खटला जनहिताचा नसून तो काँग्रेसचाच होता आणि तोही भाजप आणि भाजप अध्यक्षांच्या हानीसाठी दाखल करण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे, असे सांगत राहुलजी, आता तुमचे न्यायालयाच्या या निर्णयावर काय म्हणणे आहे, जनतेकडून इतक्या वेळा अपयशी ठरुनही न्यायालयाच्या गल्ल्यांमधूनच तुमची राजकीय खेळी पुढे चालू ठेवणार का? असा सवालही त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून विचारला. तसेच अजूनही काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मानायला तयार नसेल तर त्यावरही राहुल गांधी यांनी उत्तर दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 
राहुल गांधी हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च स्थानी आहेत का, असा सवाल उपस्थित करत हिंदीतील "ना खाता ना बही, राहुल गांधी जो कहें क्या बस वही सही?" या म्हणीचा वापर करत गौरव भाटीया यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी आपली चूक मान्य करून अमित शहांची, देशाची आणि कायदा व्यवस्थेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
याबरोबरच संबीत पात्रा म्हणाले की, राहुल गांधी, देशातील जनतेचा विश्वास तुम्ही गमावला असून तुमच्या अकार्यक्षमतेमुळे सत्ता तुमच्या हातातून गेली आहे, त्यामुळे सूडभावनेने हे सगळे केले जात आहे. तसेच काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी कशाप्रकारे राजकीय सूडापोटी न्यायालयाच्या माध्यमातून राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला, हे आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले,
 
@@AUTHORINFO_V1@@