आ. एकनाथराव खडसे दाखल करणार दमानियांविरोधात १० कोटींचा दावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 

 
जळगाव, १८ एप्रिल :
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी ऍड. प्रकाश बी. पाटील यांच्यामार्फत अंजली दमानिया यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठविली आहे. दमानिया यांनी वेळोवेळी आ. खडसे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या संदर्भात पुरावे सादर करावेत अन्यथा लेखी माफीनामा द्यावा. माफीनामा न दिल्यास अब्रूनुकसानीच्या खटल्याला सामोरे जावे, असे या नोटिसात म्हटले आहे.
 
 
आ. खडसे यांचे चारित्र्यहनन होईल, इतरांच्या नजरेतून त्यांची प्रतिमा खालावेल, त्यांना राजकीय स्थैर्य मिळू नये या उद्देशाने त्यांच्यावर निराधर व बेछूट आरोप करण्यात आले असल्याचा उल्लेख नोटिसीत असून, त्याची उदाहरणे सविस्तरपणे मांडण्यात आली आहे. दमानिया यांनी या आरोपांच्या संदर्भात पुरावे सादर करावेत अन्यथा लेखी माफीनामा द्यावा. माफीनामा न दिल्यास फौजदारी स्वरुपाचा बदनामीचा खटला आणि दिवाणी स्वरुपाचा अब्रू नुकसानीच्या खटल्याला सामोरे जावे, असेही नोटिसीत म्हटले आहे. यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी अप्रत्यक्षपणे न्यायालयावरही पक्षपाताचा आरोप केला. तसेच आ. खडसे यांनी एकही खटला आपल्याविरूध्द दाखल केला नसल्याचे सांगितले होते. दमानिया यांचा मान राखत त्यांच्याविरूध्द बदनामीचा खटला दाखल करण्याचा निर्णय आ. खडसे यांनी घेतला आहे. त्यासाठी १६ एप्रिल २०१८ रोजी ऍड. प्रकाश बी. पाटील यांच्यामार्फत दमानिया यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
 
 
दुसर्‍यांदा नोटीस
वकिलांमार्फत अंजली दमानिया यांना नोटीस बजावली आहे. ही दुसरी नोटीस आहे. विहीत मुदतीत त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. दमानिया यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरूध्द १० कोटी रुपये मूल्याचा अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती आ. खडसे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
वकिलामार्फत नोटीस
१ आरोपांबाबत द्यावेत पुरावे किंवा द्यावा लेखी माफीनामा
२ अन्यथा फौजदारी, दिवाणी स्वरुपाच्या खटल्याला सामोरे जावे
@@AUTHORINFO_V1@@