मनपा आयुक्तांच्या संमतीशिवाय पाणीपुरवठ्यात होताहेत बदल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 
 
 
जळगाव, १८ एप्रिल :
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करताना आयुक्तांची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का? नागरिकांची सोय होण्यापेक्षा त्यांना त्रासदायक ठरेल असा बदल करून प्रशासनाने काय साधले?असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
 
 
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप नगरसेवकांना त्रास होईल, त्यांच्या प्रभागातील रहिवाशांना जलसंकटाला सामोरे जावे लागेल अशाप्रकारचे निर्णय मुद्दाम काही अधिकारी घेत आहेत का? असा प्रश्‍न प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका जयश्री पाटील यांनी उपस्थित केला आहे.
 
 
पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी ९ एप्रिल २०१८ रोजी एक आदेश काढून गणेश कॉलनीतील पाणीपुरवठा तीन दिवसांऐवजी दोन दिवसाआड केला. हा निर्णय घेताना चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात तसे काहीएक घडले नाही. उलट पाण्याचे वेळापत्रक बदलल्यापासून कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी वाढत आहेत. यापूर्वी असे कधी घडले नव्हते असा दावा जयश्री पाटील यांनी केला आहे. गणेश कॉलनी परिसरात रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरू राहात असल्याचा अभियंता डी. एस. खडके यांचा दावादेखील खोटा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
उत्तराची प्रतीक्षा
पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्यापूर्वी आयुक्तांची परवानगी घेतली होती का? शहराचे वेळापत्रक कितीवेळा अचूकपणे पाळले जाते याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता खडके यांनी जाहीर करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@