आयटी मंत्रालयाच्या महिला सुरक्षेसाठी पॅनिक बटण सुविधा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार संपूर्ण देशभरात ‘पॅनिक बटण’ सुविधेची तयारी करत आहे. यामध्ये २०१८ या वर्षाअखेरीपर्यंत मोबाईल फोन, बस, टॅक्सी आणि इतर वाहनांमध्ये ही व्यवस्था लागू केली जाणार आहे.
 
 
 
दिल्ली एनसीआरमध्ये या सुविधेची चाचणी घेण्यात आली असून केवळ नोएडामध्ये १०० पेक्षा जास्त ठिकाणांवर याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय साहनी यांनी चाचणीच्या यशस्वीतेनंतर ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्यूटिंग’ (सी-डॅक)ला राष्ट्रीय स्तरावर पॅनिक बटण लागू करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले आहेत. सी-डॅकला २०१८च्या अखेरीपर्यंत नवीन-जुने मोबाईल, बस, टॅक्सी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये लागू करण्याविषयी सांगण्यात आले आहे. या शिवाय प्रिंटर, फोटोकॉपी मशीन यांसारख्या उपकरणांमध्येही ही सुविधा बसवण्यास सांगितले आहे.
 
मंत्रालयानुसार, एनसीआर चाचणीदरम्यान आलेल्या त्रुटींवर काम करण्यात आले असून आयटी मंत्रालय राज्यांच्या चाचणीच्या सूचनेसोबत प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. तसेच गृह सचिवांकडे चाचणी यशस्वीतेची माहिती ही देण्यात आली आहे. पॅनिक बटनासोबत कोणताही गैरप्रकार करणे शक्य होणार नसून तसा प्रयत्न केला गेल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच यासंबंधी आयटी मंत्रालय गृह मंत्रालयाशी चर्चा करणार आहे.
 
उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणासोबत अन्य सरकारही पहिल्यापासून या सुविधेला लागू करण्यास तयार आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन आयटी मंत्रालयाने मोबाईल कंपन्यांना मोबाईलमध्ये पॅनिक बटण सुविधा अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
@@AUTHORINFO_V1@@