जाधव यांच्या अधिकारांसाठी सरकार कटीबद्ध : परराष्ट्र मंत्रालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |


नवी दिल्ली : कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने अटक केलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या अधिकाऱ्यांच्या रक्षणा भारत सरकार पूर्णपणे कटीबद्ध असून यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे स्पष्टीकरण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने वरील आश्वासन दिले आहे.

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करून जाधव यांना अटक केली. तसेच परस्पर त्यांच्यावर सुनावणी करून त्यांना शिक्षा देखील दिली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याने एकदा देखील भारताला कळवले नाही, यावरून पाकिस्तानची खरी मानसिकता काय आहे, हे कळून येते. परंतु भारत सरकार जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, असे आश्वासन परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गेल्या १७ जानेवारीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला दिलेल्या निर्देशानुसार भारताने आपले दुसरे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले आहे. यामध्ये पाकिस्तान गेल्या डिसेंबर महिन्यात दाखल केलेल्या आपल्या स्पष्टीकरणाला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. तसेच जाधव यांच्या अटकेप्रसंगी पाकिस्तानने कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार केला होता ? असा प्रश्न भारताने विचारला आहे. यावर पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने येत्या जुलै महिन्यांची मुद्दत दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@