ग्रामीण महाराष्ट्र उघड्यावरील शौचापासून मुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत घोषणा

साडे तीन वर्षात ५५ टक्के कुटुंबांना शौचालय उपलब्ध करून दिले




मुंबई :
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियांनाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या हागणदारीमुक्त मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र राज्याने मोठी मजल मारली असून ग्रामीण महाराष्ट्र हे पूर्णपणे उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचे हे मोठे यश असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
गेल्या साडे तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील एकूण १ कोटी ६६ हजार कुटुंबांना शौचालयाचा अॅक्सिस दिल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाने यासाठी सातत्यने प्रयत्न करत, ४५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च केला आहे. यामधून राज्यातील दुर्गम जिल्ह्यांसह अगदी पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शौचालयांची निर्मिती केली आहे. गेल्या ६७ वर्षांच्या काळात महाराष्ट्र फक्त ५० लाख शौचालयांची निर्मिती झाली होती. परंतु आता मात्र फक्त साडे तीन वर्षांमध्ये ६० लाख शौचालयांची निर्मिती सरकारने केली आहे,  असे त्यांनी सांगितले. तसेच या कामगिरीसाठी राज्य शासनाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याचे कौतुक देखील त्यांनी यावेळी केले.
सर्वात वेगाने काम करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली होती. तसेच ग्रामीण भागात शौचालयांची निर्मिती करण्याची गरज व्यक्त केली होती. पंतप्रधानांनी दिलेले हे कार्य महाराष्ट्र सरकारने हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि फक्त साडे तीन वर्षांच्या आत महाराष्ट्र राज्य हे पूर्णपणे उघड्यावरील शौचालयापासून मुक्त झाले आहे. संपूर्ण देशामध्ये सर्वात वेगाने शौचालयांची निर्मिती करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले असून राज्यासाठी ही अत्यंत गौरवाची बाब असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची संपूर्ण पत्रकार परिषद :


 
@@AUTHORINFO_V1@@