कठुआप्रकरणी माध्यमांना १० लाखांचा दंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |

पीडितेची ओळख उघड केल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाचा माध्यमांना दणका

 

 
 
 
दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये ८ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक आत्याचार झाल्यानंतर तिचा निर्घूण खून करण्यात आला. या घटनेतील पीडित मूलीची ओळख ज्या माध्यमांमुळे उघड झाली त्या माध्यमांना दिल्ली उच्च न्यायालयाने १० लाखांच्या दंडाची शिक्षा आज सुनावली आहे. यामध्ये न्यायालयाने या माध्यमांची यादी तयार करून संबंधित विषयावर नोटीसा पाठवल्या आहेत.
 
न्यायालयाने दिलेल्या नोटिसीमध्ये, ज्या माध्यमांनी घटनेतील पीडितेची ओळख उघड केली अशा माध्यमांनी १० लाखांचा दंड न्यायालयाकडे जमा करायचा आहे, त्यानंतर जमा झालेल्या निधीची रक्कम ही जम्मू-काश्मीरच्या नागरी सहायता निधीकडे सुपुर्त करण्यात येईल, असे म्हटले आहे.
 
महिलांच्या बाबतीत घडणऱ्या अशा गुन्ह्यांविषयीचे वृत्तांकन करताना पीडित महिलांची, मुलींची नावे किंवा ओळख उघड केली जात नाही तर ती गोपनीय ठेवली जातात, मात्र या घटनेतील वृत्तांकन करताना माध्यमांनी हा नियम मोडीत काढत सर्रासपणे पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने माध्यमांना चांगलाच दणका दिला आहे. सध्या कठुआ बलात्कार आणि खून प्रकरणी संपूर्ण देशभरातून विविध स्तरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@