मुलांना चुका करू द्या आणि त्या चुकांमधून शिकू द्या : राजीव तांबे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |

सर्जनशील सुट्टी या साहित्य परिषदेच्या कार्यशाळेला पालकांचा तुफान प्रतिसाद

 
 
 
पूणे : ज्या गोष्टी शाळा सुरु असताना करता येत नाहीत त्या करण्यासाठी सुट्टी असते. पण पालक सुट्टीतही मुलांना अकारण गुंतवून ठेवतात. त्यामुळे मुलांना सुट्टीचा आनंद उपभोगता येत नाही. मुलांना शिकवू नका, त्यांना अनुभवातून शिकू द्या. मुलांना चुका करू द्या आणि त्या चुकांमधून शिकू द्या, असा सल्ला बालकुमारांसाठी लेखन करणारे प्रसिद्ध साहित्यिक राजीव तांबे यांनी पालकांना दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पालकांसाठी आयोजित सर्जनशील सुट्टी या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी लेखिका संगित पुराणिक यांनीही पालकांशी संवाद साधला. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह माधव राजगुरू, वि. दा. पिंगळे, लेखिका संगिता बर्वे उपस्थित होत्या.
 
 
मुलांना सर्जनशील बनविण्यासाठी आणि वाचतं करण्यासाठी शून्य खर्चाच्या शंभर कल्पना राजीव तांबे यांनी पालकांना यावेळी सांगितल्या. स्वयंपाकघरातील कृतीपासून ते चित्र रंगवण्यापर्यंत आणि बिया गोळा करण्यापासून ते लेखन वाचनापर्यंत अनेक गोष्टींचा त्यात समावेश होता. संगिता पुराणिक म्हणाल्या, मुलांना नकार पचवायला शिकवा. त्यातून त्यांना जगण्यासाठीचे बळ मिळेल. मुलांच्या सुट्टीचा ताण न घेता पालकांनीही त्यांच्याबरोबर सुट्टीचा आनंद घेतला पाहिजे. मुलांसाठी वेळ द्या. त्यांच्याशी भरपूर गप्पा मारा. 
 

 
 
प्रा. जोशी म्हणाले, आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नका. त्यांना रेसचे घोडे बनवू नका. प्रेम आणि अपेक्षांचा कडेलोट झाल्यामुळे मुलांचे व्यक्तिमत्व कोमेजून जाते. तसे होऊ देऊ नका. त्यांना पुस्तकाबाहेरचे जग शिकण्याची संधी सुट्टीत मिळाली पाहिजे. या कार्यशाळेत मुलांसाठी वाचनीय शंभर पुस्तकांची यादी पालकांना देण्यात आली. कार्यवाह माधव राजगुरू यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  
 
@@AUTHORINFO_V1@@