कबीर मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयांवर छापे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |


पुणे : गेल्या ३१ डिसेंबरला पुण्यात भरलेल्या एल्गार परिषद आणि त्यानंतर भीमा कोरेगाव येथे दलित समाजावर झालेल्या दगडफेकीच्या कारणावरून पुण्यातील कबीर मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयांवर पोलिसांनी धाड टाकण्यास सुरुवात केली आहे. पुणे आणि मुंबई येथे असलेल्या या दोन्ही संघटनाच्या कार्यालयांवर आणि संबंधित घरांवर पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच संशयितांची चौकशी देखील पोलिसांकडून केली जात आहे.


आज पहाटेपासूनच पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली आहे. एल्गार परिषदेनंतर झालेल्या दगडफेकीत आणि बंदातील हिंसाचारात या दोन संघटनांचा देखील हात असल्याच्या संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही संघटनांची कायदेशीर चौकशी करण्यासाठी म्हणून सर्च वॉरंट घेऊन ही कारवाई केली. पुण्यातील कबीर कला मंचच्या सर्व कार्यकर्त्यांच्या घरावर तर मुंबईत रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. दरम्यान या पोलिसांकडून तपास अजून सुरू असून याविषयची अधिक माहिती अजून समोर येऊ शकलेली नाही.


गेल्या डिसेंबर महिन्यात दलित चळवळींकडून पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जेएनयू नेता उमर खालिद आणि जिग्नेश मेवाणी हे दोघे पुण्यात आले होते. यावेळी भाषणामध्ये त्यांनी भाजप आणि संघाविरोधात अनेक प्रक्षोभक भाष्य केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथे दलित समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. त्यानंतर राज्यभर ३ जानेवारी रोजी दलित संघटनांकडून बंद पाळण्यात आला होता. या बंदात अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात आली होती. या घटनेनंतर ७ जानेवारीला कबीर कला मंचच्या ४ जणांवर आणि रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
@@AUTHORINFO_V1@@