जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील त्रालच्या सीर भागात आज जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून सुरक्षा रक्षकांनी देखील या हल्ल्याला चोख प्रतिउत्तर दिले आहे. सेनेची गाडी त्राल भागामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना दहशतवाद्यांनी या गाडीत असलेल्या तुकडीवर हल्ला चढविला.
 
 
सध्या सुरक्षा रक्षकांनी या भागाला संपूर्ण घेरले असून सध्या या भागात शोध मोहीम जोरदार सुरु आहे. दहशतवाद्यांनी ४२ आर आर बटालियन तुकडीवर हल्ला केला. अजून देखील काही ठिकाणी चकमक सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागांमध्ये दहशतवाद्यांकडून सतत हल्ला केला जात आहे.
 
 
 
काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती लागले होते. सुरक्षा रक्षकांनी सात दहशतवाद्यांना ठार केले असून एका दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. या दहशतवाद्यांना अनंतनाग भागात एक तर शोपियान भागातून पकडले होते. पुलवामा, अनंतनाग, त्राल, शोपियान या भागांमध्ये दहशतवाद्यांकडून नेहमीच गोळीबार केला जातो. 
 
@@AUTHORINFO_V1@@