नरेंद्र मोदी आणि स्टेफान ल्योव्हेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
स्टॉकहोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टेफान ल्योव्हेन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. नरेंद्र मोदी आणि स्टेफान ल्योव्हेन यांच्यात उर्जा, शहरी वाहतूक आणि कचरा व्यवस्थापन या विषयांवर चर्चा झाली. सध्या नरेंद्र मोदी स्वीडनच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी आज स्टेफान ल्योव्हेन यांची भेट घेतली असून विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
 
 
 
 
‘मेक इन इंडिया’ यामध्ये स्वीडन खूप मोठा भागीदार आहे. २०१६ मध्ये मुंबईमध्ये जो ‘मेक इन इंडिया’चा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात स्वीडनने चांगला सहभाग नोंदविला होता. तेव्हापासून आतापर्यंत स्वीडनचे भारतासोबत सकारात्मक संबंध आहेत असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच स्वीडन दौरा आहे. नरेंद्र मोदी यांचे आज स्वीडनमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 
 
 
 
भारताच्या विकासात स्वीडन कशी भागीदारी बजावतो तसेच पुढे दोन्ही देश मिळून अनेक क्षेत्रात एकमेकांना मदत कशी करणार याविषयावर आज आम्ही जास्त चर्चा केली असे त्यांनी यावेळी म्हटले. याचे परिणाम दिसावे यासाठी आम्ही आज अभिनव भागीदारी आणि संयुक्त कृती योजनेवर सहमती नोंदविली आहे अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@