चंद्रपूर क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात - देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
पावसाळा येईपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याची गरज - सुधीर मुनगंटीवार
 

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणी टंचाई भासू नये यासाठी अल्पकालीन उपाययोजना तातडीने करण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई काळात पाणीपुरवठा करण्याबाबत आढावा बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
 
 
 
चंद्रपूर शहराला पाणीपुरठा करणाऱ्या पाणी स्त्रोतामधील ज्या ठिकाणी पाणीसाठा कमी झाला आहे त्याठिकाणी गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गाळ काढल्यामुळे भविष्यात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर शहराला पावसाळा येईपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या चंद्रपूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचा १५ जूननंतर आढावा घेवुन चंद्रपूर औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये वीज निर्मितीसाठी चालू असलेल्या तीन संचापैकी एखादा संच बंद करावा. तसेच मृत जलसाठ्यामधून पाणी घेण्यासाठी येणारा खर्च ऊर्जा विभागाने उचलावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@