नोटाबंदी आणि जीएसटीच्या प्रभावातून भारत बाहेर : वर्ल्ड बँक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |


नवी दिल्ली : भारत सरकारने लागू केलेली नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करप्रणालीच्या मंदीमधून भारतीय अर्थव्यवस्था आता बाहेर आली आहे, अशी माहिती वर्ल्ड बँकेने जाहीर केली आहे. वर्ल्ड बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालामध्ये याविषयी माहिती जाहीर केली असून भारत सरकारच्या या दोन निर्णयांचा भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा झाला आहे, असे देखील वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे.

गेल्या २०१६ आणि २०१७ मध्ये भारत सरकारने अनुक्रमे देशात नोटाबंदी आणि जीएसटी करप्रणाली लागू केली. भारत सरकारच्या या निर्णयाचा परिणाम तात्पुरत्या स्वरुपात भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला. परंतु आता भारतीय अर्थव्यवस्था या दोन्हींच्या प्रभावातून बाहेर पडली असून यादोन निर्णयांमुळे भारताचा विकासदर २०१८ मध्ये ७.३ टक्क्यांवर जाऊन पोहोचेल, असा विश्वास देखील वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे.

याच बरोबर भारतात वेगाने वाढत असलेल्या परकीय गुंतवणुकीचे देखील वर्ल्ड बँकेने कौतुक केले आहे. भारतात येत असलेली परकीय गुंतवणूक आणि देशात वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिकीकरणाचा भारताला येत्या काही वर्षांमध्ये अत्यंत चांगला उपयोग होणार असून भारताचा वृद्धीदर आणखी वाढू शकतो.
@@AUTHORINFO_V1@@