सीबीआयचा लालू कुटुंबियांना आणखी एक दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |

रेल्वे हॉटेल टेंडरिंग प्रकरणी लालू कुटुंबीयांवर आरोपपत्र दाखल 




पटना :
चारा घोटाळाप्रकरणी अगोदरच शिक्षा भोगत असलेल्या राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत आता आणखी थोडी वाढ झाली आहे. आपल्या कार्यकाळामध्ये आर्थिक अफरातफर केल्याच्या आरोपाखाली पोलीस चौकशीचा ससेमिरा मागे लागलेल्या लालू कुटुंबीयांवर सीबीआय आता आणखी एक आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये लालू कुटुंबीयाने रेल्वे हॉटेलच्या टेंडरमध्ये (निविधा) गैरव्यवहार केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी यादव आणि पुत्र तेजस्वी यादव या तिघांविरोधात सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये लालू प्रसाद यादव यांनी आपल्या रेल्वे मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये रेल्वे हॉटेलचे टेंडर देण्यामध्ये प्रचंड मोठी अफरातफर करत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. तसेच राबडीदेवी यांनी देखील आपल्या मुख्यमंत्री पदाचा गैरफायदा घेत लालू यांच्या अवैध्यकामांमध्ये त्यांना सहकार्य केले, रेल्वे टेंडरिंगमध्ये तेजस्वी यादव यांनी देखील पैशाची अफरातफर केल्याचा खुलासा सीबीआयने केला आहे. त्यामुळे या तिघांविरोधात देखील सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले आहे.
सीबीआयने गेल्या वर्षी हॉटेल टेंडरिंगच्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली होती. यामध्ये रांची आणि पुरी येथे असलेले रेल्वे मंत्रालयाच्या दोन हॉटेलचे टेंडर पटनातील सुजाता हॉटेलच्या मालकांना दिले गेले होते. विशेष म्हणजे या हॉटेलचे मालकांचे लालू कुटुंबियांबरोबर अत्यंत जवळचे संबंध असल्याचे त्यानंतर तपासात पुढे आले. तसेच हे टेंडर देण्यासाठी लालू यांनी मोठ्या प्रमाणात लाच घेतली असल्याचेही यानंतर तपासात पुढे आले होते.
@@AUTHORINFO_V1@@