चीनची वाढती घुसखोरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018   
Total Views |


चीनची घुसखोरी हा विषय तसा भारतासाठी नवा नाही. पण, गेल्या ३५ दिवसांमध्ये चीनने भारतामध्ये तब्बल ३५ वेळा घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पुन्हा हा विषय किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. गेल्या एका महिन्यात लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने सर्वाधिक घुसखोरी केली. गेल्या ३० दिवसांमध्ये चीनच्या सैन्याने तब्बल ३५ वेळेस एलएसी पार केली आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) विरोध केल्यानंतर चिनी सैन्याने माघार घेतली आहे. आयटीबीपीच्या अहवालात याबाबत खुलासा झाला आहे. आयटीबीपीने गृहमंत्रालयाला हा अहवाल पाठवला आहे. चीनने या महिन्यातच उत्तर लडाखमध्ये सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास १४ किमी भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली, पण आयटीबीपीने त्यांना परतण्यास भाग पाडलं. इतकंच नाही तर गेल्या १७ दिवसांमध्ये तीन वेळेस चिनी सैन्याचं हेलिकॉप्टर भारताच्या हवाई हद्दीत घुसलं होतं. लडाखच्या डेपसांग परिसरात चीनने सातत्याने घुसखोरी केली आहे. १७ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २८ मार्च आणि १ एप्रिल रोजी १० ते १९ किमीपर्यंत चीनने घुसखोरी केली होती, असं आयटीबीपीने गृहमंत्रालयाला दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेश हे भारताचे घटकराज्य असले आणि तेथील कारभार भारतीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला असला तरीही तो दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. अरुणाचल प्रदेशची १९६२च्या आधी ‘नॉर्थ इस्ट फ्रंटियर एजन्सी’ (नेफा) म्हणून ओळख होती. १९६५ पर्यंत इथल्या प्रशासनाची देखभाल परराष्ट्र व्यवहार खात्याकडे होती. १९६५ नंतर इथले प्रशासन गृहखात्याकडे आले. १९७२ मध्ये केंद्रशासित प्रदेश आणि १९८७ मध्ये भारताचे २४ वे घटकराज्य म्हणून अरुणाचल प्रदेश राज्य अस्तित्वात आले.


वर्षानुवर्षे भारतीय अधिपत्याखाली असलेला हा प्रदेश चीनला वादग्रस्त वाटतो. त्यासंदर्भात चीनची दांडगाईची भूमिका कायम आहे. तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामांशी भारताचे असलेले संबंध हा चीनसाठी कायमच पोटदुखीचा विषय ठरला आहे. भारत आणि चीनदरम्यान सीमावाद पुन्हा उफाळलाय. अगोदर चीनच्या हेलिकॉप्टरने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून आता भारताच्या बांधकामावर चीनने हरकत घेतली आहे. लडाखमध्ये चीन घुसखोरी करत असल्याने भारताने तिथे गस्त वाढवली आहे. त्याला चीनने हरकत घेतली आहे. इतकंच नाही, तर लडाखमध्ये भारताने केलेल्या बांधकामालाही, विशेषतः रस्ते आणि पूल यांना चीनने हरकत घेतली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारताने दोनदा ध्वज बैठक बोलावली होती. पण, या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे भारताने आता तिसर्‍या बैठकीची तयारी चालवलीय. त्याला चीनने प्रतिसाद दिला नाही. मात्र, हे प्रकरण तितकं गंभीर नाही, असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे दाखवलं जात आहे. दोन वर्षांपूर्वी भारत आणि चीनमध्ये सीमावाद उफाळला होता. त्यावेळेस चीनच्या हेलिकॉप्टरने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून भारताच्या बांधकामावर हरकत घेतली होती. लडाखमध्ये चीन घुसखोरी करत असल्याने भारताने तिथे गस्त वाढवली होती. त्यावेळेसही चीनने भारताच्या या भूमिकेवर हरकत घेतली होती. इतकंच नाही, तर लडाखमध्ये भारताने केलेल्या बांधकामालाही, विशेषतः रस्ते आणि पूल यांना चीनने हरकत घेतली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारताने दोनदा ध्वज बैठक बोलावली होती. पण, या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या होत्या. त्यानंतर भारताने आता तिसर्‍या बैठकीची तयारी केली होती. पण, आपलंच म्हणणं खरं करण्याची भूमिका घेणार्‍या चीनने बैठक घेण्यासाठी प्रतिसाद दिला नाही. तसेच जागतिक अर्थकारणात स्वत:चे वेगळे महत्त्व निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा चीनने बाळगली आहे. त्याचबरोबर आर्थिक आघाडीवर भारत आणि चीनमधील स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत जाईल, यात शंका नाही.


- सोनाली रासकर
@@AUTHORINFO_V1@@