डॅनिश महिला सामूहिक बलात्कारप्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपींची याचिका फेटाळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : २०१४ मध्ये नवी दिल्लीत ५२ वर्षीय डॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाच कैद्यांची याचिका फेटाळत दिल्ली उच्च न्यायालयाने आज त्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवल्याचा निकाल दिला आहे. १४ जानेवारी २०१४ रोजी डॅनिश महिलेवर दिल्लीत सामुहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी २०१६ साली न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
 
न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि आय. एस. मेहता म्हणाले, पीडित तरुणीची साक्ष आणि मिळालेल्या डीएनए रिपोर्टच्या पुराव्यावरून या पाच जणांना दोषी ठरवण्यात आले होते. योग्य तपासणी न केल्याबद्दल खंडपीठाने खटल्याच्या तपास अधिकाऱ्याला देखील खडे बोल सुनावले. १० जून २०१६ रोजी न्यायालयाने या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, त्यामध्ये २०१४ मधील ही घटना अपहरण, सामूहिक बलात्कार तसेच अमानुष व क्रूर कृत्य आहे त्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेला कलंक लागला असल्याचे उच्च न्यायालयाने म्हणलं आहे.
 
यामध्ये आरोपींनी भारतीय दंडविधान कलम ३७६ (डी) नुसार सामूहिक बलात्कार, ३९५ नुसार दरोडा, ३६६ नुसार अपहरण, ३४२ नुसार चूकीची शिक्षा, ५०६ नुसार गुन्हेगारी धमकी आणि ३४ नुसार सामान्य उद्देश या कारणांसाठी दोषी ठरण्यात आले.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी २०१४ रोजी, नऊ जणांनी शस्त्रांच्या धाकाने सगळ्या डॅनिस पर्यटकांना लुटले व त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केला. तसेच ५२ वर्षीय महिलेला रेल्वे स्थानकाजवळील एका निर्जन रस्त्यावर आणून सोडले. १ जानेवारी २०१४ रोजी ही महिला दिल्लीमध्ये आली होती.
 
अनेक ठिकाणांना भेट दिल्यानंतर १३ जानेवारी रोजी ती दिल्लीला परतली व स्टेशन जवळच्या पहारगंज येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले. त्यानंतरच्या दिवशी ती हॉटेलकडे परतत असताना रस्ता चुकल्यामुळे आरोपीतील एकाला तिने रस्ता विचारला असता, त्याने हल्ला करून सामूहिक बलात्कार केला. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@