पंतप्रधान मोदी आजपासून युरोप दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |

पाच दिवसांच्या दौऱ्यात ब्रिटेन आणि स्वीडनला देणार भेट


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून पाच दिवसीय युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या या पाच दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे ब्रिटेन आणि स्वीडन या दोन देशांना भेट देणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांच्या राष्ट्र प्रमुखांची ते भेट घेणार असून याठिकाणी होणाऱ्या काही कार्यक्रमांमध्ये देखील ते सहभागी होणार आहेत.
आपल्या या दोन देशांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे प्रथम स्वीडनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांची ते भेट घेणार आहेत. याभेटीत दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि स्वीडन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर १७ तारखेला दोन्ही देशांकडून आयोजित करण्यात आलेल्या 'इंडिया-नॉर्डिक परिषदे'मध्ये देखील ते सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी फिनलँड, नॉर्वे, डेन्मार्क आणि आईसलँड या देशांचे प्रमुख देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत.




यानंतर १८ तारखेला पंतप्रधान ब्रिटेनच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या ठिकाणी ब्रिटेनच्या राणी एलिझाबेथ यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर ब्रिटेनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करून भारत आणि ब्रिटेन यांच्यात काही महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे. तसेच ब्रिटेनमध्ये होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांच्या प्रमुखांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देखील ते सहभागी होणार आहेत.





@@AUTHORINFO_V1@@