मुंबईच्या नाणार प्रकल्प कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |
 
 
 
 

मुंबई : कोकणात उभारण्यात येणारा नाणार रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत कोकणात होऊ देणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगतिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी आज ताडदेव येथील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
 
मनसेच्या ५ ते ६ कार्यकर्त्यांनी कार्यालयात घूसून तेथील सूरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत तोडफोड केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत करार केल्यानंतर येथील स्थानिकांचा विरोध तीव्र झाला आहे. दरम्यान शिवसेना, मनसे, काँग्रेस या पक्षांकडूनही या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला जात आहे.
 
नाणार प्रकल्पात राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी लक्ष घालावे यासाठी नाणारवासीयांनी मागील शुक्रवारी त्यांची भेट घेतली. यावेळी आपण जागेची आणि त्याठिकाणच्या परिस्थितीची पाहणी करून आपली भूमिका ठरवणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. त्याप्रमाणे १० मे रोजी नाणार प्रकल्पस्थळाला भेट देणार असून तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा कऱणार आहेत. याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील प्रकल्पाला विरोध दर्शवला असून काँग्रेस नेत्यांची एक टीम १९ एप्रिल रोजी नाणारला भेट द्णार आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील २३ एप्रिल रोजी स्थानिकांना भेट देणार आहेत.
 
या सगळ्या पार्श्वभूमीमुळे नाणार रिफायनरी प्रकल्प सुरळीतपणे पार पडणार का, याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@