अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक नियमाखालील चार गुन्ह्यांची निर्गती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |
जळगाव : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी मार्च महिन्यात पोलीस विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या दोन व अनुसूचित जमातीच्या दोन अशा एकूण चार गुन्ह्यांची निर्गती केल्याची माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली.
 
 
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. या बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, समिती सदस्य तथा जिल्हा सरकारी वकील ङ केतन ढाके, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. सी. शिरसाठ, जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुनील कुराडे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातर्ंगत फेब्रुवारी २०१८ अखेर अनुसूचित जातीचे १९ गुन्हे तर अनुसूचित जमातीचे १२ गुन्हे पोलीस तपासावर आहेत. यापैकी चार गुन्ह्यांची निर्गती झाली आहे. तसेच मार्च २०१८ या महिन्यात ४ गुन्हे नव्याने दाखल झाले असून यामध्ये दोन बलात्कार व दोन विनयभंगाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यापैकी ३ प्रकरणांना उच्च न्यायालयाची स्थगिती, ३ प्रकरणे न्यायालय स्तरावर, ३ प्रकरणात विधी अधिकारी यांचा अभिप्राय घेणे, १ प्रकरणात जात प्रमाणपत्र हस्तगत करणे तर २१ प्रकरणांमध्ये अधिक पुरावा घेणेची कार्यवाही सुरु असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक श्री. कुर्‍हाडे यांनी बैठकीत दिली. या कायद्यातर्ंगत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्याची सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांनी यावेळी दिली.
 
 
अनुसचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली घडलेल्या गुन्ह्यातील ६६ अत्याचार पिडीतांना गेल्या एप्रिल २०१७ पासून ५५ लाख ५३ हजार ८७५ रुपयांचे अर्थसहाय मंजूर करण्यात आले आहे. अशी माहिती खुशाल गायकवाड, सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी बैठकीत दिली.
@@AUTHORINFO_V1@@