यावर्षी भारतात ९७ टक्के मान्सून असल्याचा अंदाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
मान्सून हा भारताच्या कृषीसाठी खूपच महत्वाचा ऋतू मानला जातो. त्यामुळे उन्हाळा सुरु झाल्याबरोबरच यावर्षी किती पाऊस पडणार याचे भाकीत मांडायला सुरुवात होतांना आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे यावर्षी भारतात ९७ टक्के मान्सून असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज वर्तविला आहे.
 
 
आज नवी दिल्ली येथे भारतीय हवामान खात्याकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हवामान तज्ञांकडून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यावर्षी १५ मे या दिवशी मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल आणि या तारखेपासून भारताच्या काही भागांत पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
 
 
दरवर्षी मान्सून मे महिन्याच्या शेवटी भारतात दाखल होतो. मात्र यावर्षी मान्सून १५ दिवस आधी भारतात दाखल होणार असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना चांगले दिवस पाहायला मिळतील असा देखील अंदाज हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@