आम्ही कारवाई केली, पण तुमचं काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |

प्रकाश जावडेकर यांचा असिफा प्रकरणावरून कॉंग्रेसला सवाल




नवी दिल्ली : कठुआ हत्याकांडाप्रकरणी भाजपने आपल्या दोन मंत्र्यांवर तत्काळ कारवाई करत, त्यांचा राजीनामा घेतला आहे. परंतु या घटनेवरून भाजपला दोष देणाऱ्या कॉंग्रेस पक्षांनी आजपर्यंतच्या अशा घटनांवर काय भूमिका घेतली आहे ?' असा सवाल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी हे देखील याठिकाणी उपस्थित होते.
कठुआ प्रकरणावरून भाजपला लक्ष करू पाहणाऱ्या कॉंग्रेस पक्षावर जावडेकर यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार हल्लाबोल केला. कॉंग्रेसच्या कार्यकाळामध्ये हजारो शिख महिलांवर अत्याचार झाले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपूर्वी हरियाणात दलित समाजातील महिलांवर देखील अत्यंत क्रूरपणे हल्ले आणि अत्याचार झाले. यावेळी नेहमीप्रमाणे कॉंग्रेस पक्ष मुग गिळून गप्प बसला होता. दिल्लीतील निर्भया प्रकरणी देखील कॉंग्रेसने कसल्याही प्रकारची हालचाल केली नव्हती आणि आज तेच कॉंग्रेसवाले असिफाच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यासाठी कॅन्डल मार्च काढत आहे,' अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. तसेच असिफाचे प्रकरण हे जोधपुर घटनेप्रमाणेच फास्ट ट्रक कोर्टमध्ये चालवले जावे, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद : 

 
कॉंग्रेस आणि आप समाजाला तोडू पाहत आहेत : मनोज तिवारी
तसेच कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष हे समाजात तेढ निर्माण करून भारतीय समाजाला तोडू पाहत आहेत, अशी टीका तिवारी यांनी केली. तसेच रामनवमी दिवशी दिल्लीतील एका मशिदीबाहेर आपने आपले कार्यकर्ते पाठवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. याघटनेचे काही पुरावे देखील त्यांनी यावेळी सादर केले व विरोधक भाजपला जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले.

@@AUTHORINFO_V1@@