राज्य शासनाच्या राजकपूर आणि व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |

सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केली घोषणा


मुंबई : सिनेसृष्टीतील उत्तम कामगिरीसाठी राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या राज कपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारांची नुकतीच राज्य शासनाकडून घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्धी हिंदी सिनेअभिनेते धर्मेंद्र देओल व दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना 'राजकपूर जीवनगौरव' तर मराठीतील प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आजच याविषयी घोषणा केली आहे. राज कपूर पुरस्कारामध्ये देण्यात येणारा जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार हे अनुक्रमे धर्मेंद्र आणि राजकुमार हिराणी यांना देण्यात आला आहे. तसेच व्ही. शांताराम पुरस्कारात देण्यात येणारा जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे विजय चव्हाण आणि मृणाल कुलकर्णी यांना देण्यात येणार असल्याचे तावडे यांनी जाहीर केले आहे. राज्य शासनाच्या वतीने आयोजित यंदाच्या ५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात  पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
धर्मेंद्र देओल यांनी आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास २५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या या ४ दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. तसेच राजकुमार हिराणी यांनी देखील बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांचा मुन्नाभाई एमबीबीएस, लगे राहो मुन्नाभाई या चित्रपटांनी रसिकांच्या मनावर वेगळीच जादू केली होती. त्यांच्या थ्री इडियट्स चित्रपटाने तर हिंदी चित्रपटांचे अनेक विक्रम मोडीत काढले होते.

दरम्यान विजय चव्हाण त्यांनी देखील गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रसृष्टीला सातत्यने हसवण्याचे काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मराठी नाटके आणि चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप मराठी रसिकांच्या मनावर सोडली. तर मृणाल कुलकर्णी यांनी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@