रा.स्व.संघातर्फे बाबासाहेबांना सघोष मानवंदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |
 
रा.स्व.संघातर्फे बाबासाहेबांना सघोष मानवंदना 
जळगाव, १४ एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हर्षवर्धन प्रभात शाखेतर्फे शनिवार, १४ रोजी सकाळी रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सघोष मानवंदना देण्यात आली. तसेच रा.स्व.संघाच्या देवगिरी प्रांताचे प्रौढ शाखा विभाग प्रमुख योगेश्‍वर गर्र्गेे आणि शहर संघचालक डॉ.विलास भोळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जळगाव ‘तरुण भारत’ ने प्रकाशित केलेल्या ‘राष्ट्रपुरुष’ या विशेष पुरवणीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
प्रत्येकाला समान सामाजिक सन्मान मिळायला हवा, हा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. रा.स्व.संघ समता, बंधूता या मुल्यांचा निरंतर पुरस्कार करतो, सर्वाना समान मानतो, हे त्यांनी अनुभवाने जाणलेले होते, म्हणून त्यांचा संघकार्यावर विश्‍वास होता, असे सोदाहरण प्रतिपादन रा.स्व.संघाच्या देवगिरी प्रांताचे प्रौढ शाखा विभाग प्रमुख योगेश्‍वर गर्र्गेे यांनी यावेळी केले.
सघोष मानवंदना आणि पुष्पहार अपर्ण केल्यानंतर लगतच्या सभामंडपात आयोजित छोटेखानी मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते. डॉ.बाबासाहेब विविध विषयातील प्रकांडपंडित, दूरद्रष्टे होते. विविध गुणांनी विभूषित, गुणग्राहक होते, हेही त्यांनी पाकचा उपद्रव, स्वदेशीचा पुरस्कार याबाबतची उदाहरणे देत स्पष्ट केले. डॉ.बाबासाहेबांच्या चरित्राचे वाचन सर्वांनीच करायला हवे, असे आवाहनही योगेश गर्गे यांनी केले.
प्रारंभी व.वा.जिल्हा वाचनालयासमोरील प्रांगणात सकाळी ७.१५ वाजता शाखा झाली, प्रार्थना आणि ध्वजावतरणानंतर ७.४५ वाजता रेल्वे स्थानकाबाहेरील पुतळ्याजवळ सघोष प्रस्थान झाले. उपस्थित पदाधिकारी आणि स्वयंसेवक रांगेत शिस्तीने सोबत होते. तेथे सघोष मानवंदना आणि गर्गेजींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नंतर पूज्य भन्ते संघरत्न,संघनायक सुगतवन्स महाथेरो यांनी बुद्धवंदना, त्रिशरण घेतले. सामुहिक पद्य ‘ भीमा तुझ्यामुळे, उद्धरली कोटी कोटी कुळे’ झाले. नंतर गर्गेजींचे मार्गदर्शन आणि सांगता झाली.
ज्येष्ठ कार्यकर्ते दीपकराव घाणेकर, संघाच्या देवगिरी प्रांताचे प्रचार प्रमुख स्वानंद झारे, शहर कार्यवाह राजेंद्र ज्ञाने, सामाजिक समरसता मंचचे जिल्हा कार्यकर्ते विजय मोघे, भिका भोई, सहकार भारतीचे सतीश मदाने यांच्यासह संघ रचना आणि संलग्न, परिवारातील संस्था, संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@