वेगरे गावात मागासवर्गीय निधीतून भांडी संचाचे वितरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |
 
 
 
पिरंगुट : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वेगरे ग्रामपंचायती अंतर्गत १५% मागासवर्गीय निधीमधून वेगरे गावातील मांडवखडक, निर्गुडवाडी व धनवी येथील धनगर वस्त्यांवर सार्वजनिक भांडी संचाचे वाटप विद्यमान आदर्श सरपंच भाऊ मरगळे यांचे हस्ते आज करण्यात आले.
 
 
वेगरे गाव हे मुळशी तालुक्यातील दुर्गम व डोंगरी भागात असून उपक्रमशील गाव म्हणून गावाची ओळख आहे. गावाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सामाजिक कार्याची पदव्युत्तर पदवी घेतलेले मरगळे हे सलग ३ वेळा येथील बिनविरोध सरपंच झाले आहेत. त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेऊन काम केले आहे या काळात त्यांनी अनेक वैयक्तिक व सार्वजनिक लाभ ग्रामस्थांना मिळवून दिले आहेत.
 
 
वेगरे गावचे पुनर्वसन झाल्यापासून येथील ग्रामस्थांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी स्वयंपाक करणेसाठी भांड्याची अडचण होत होती. तसेच कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी दुसऱ्या ठिकाणावरून भांडी आणावी लागत असत. म्हणून याबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने मागणी होत होती. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांनी याबाबत ग्रामपंचायतीच्या १५% मागासवर्गीय निधीमध्ये तरतूद करून तसा सर्वानुमते निर्णय घेतला व नुकतीच आवश्यक ती भांडी खरेदी करून त्याचे वितरण करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांची होणारी अडचण दूर झाली आहे याचे समाधान आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी पोलिस पाटील यमुना मरगळे, ग्रामपंचायत सदस्य राम मरगळे, राम बावधाने, फुलाबाई ढेबे, शशिकला मरगळे, बमाबाई बावधाने, ग्रामसेवक विजयकुमार अडसूळ, राजेंद्र जोशी, मलिक कोकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@