गरज पडली तर सिरीयावर आणखी एक हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |

अमेरिकेचा पुन्हा एकदा इशारा



न्यूयॉर्क :
सिरीयामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्याचा विरोध म्हणून अमेरिकेने सिरीयावर केलेल्या हल्ल्यानंतर गरज पडल्यास सिरीयावर आणखी एक हल्ला करू, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी हा इशारा दिला असून अमेरिकेच्या राजदूत निकी हेले यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच इराण आणि रशियाने यावर उलट कारवाई करण्याऐवजी सिरीयाप्रश्नी चर्चेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

अमेरिकेने सिरीयावर काल केलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य कार्यालयात एक तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये रशियाने अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटेनने सिरियात केलेल्या हल्ल्याविरोधात सभागृहात प्रस्ताव सादर केला. यावर काही देशांचा पाठींबा घेण्याचा देखील रशियाने प्रयत्न केला. परंतु रशियाच्या प्रस्तावाला बहुमत मात्र मिळाले नाही. यानंतर निकी हेले यांनी अमेरिकेची भूमिका मांडत, सिरीयावरील हल्ल्याचे समर्थन केले. तसेच गरज पडल्यास अमेरिका अनेक एक हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा पेन्स यांनी दिल्याचे देखील त्यांनी सभागृहात सांगितले.

तसेच फ्रान्स आणि ब्रिटेनच्या पाठींब्याने अमेरिकेने सभागृहासमोर एक मसुदा सादर केला असून यामध्ये सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्याविषयी आणि सिरियातील समस्येवर चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याविषयी या तिन्ही देशांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावर अजून सभागृहात चर्चा सुरु असून यासाठी रशिया आणि इराणने देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन अमेरिकेने केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@