पी.व्ही सिंधूवर सायना नेहवालचा विजय, दोन्ही पदकं मायदेशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |


 
गोल्ड कोस्ट : गोल्डकोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतीय खेळाडू उत्तम प्रदर्शन करत आहेत. काल भारताला एक अत्यंत रोमांचक सामन्याचा अनुभव घेता आला. राष्ट्रकुल बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम लढतीत भारताच्याच सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधूव एकमेकांसमोर होत्या. या सामन्यात सायना नेहवाल हिने पी.व्ही. सिंधूला मात देत विजय मिळवला. आणि सुवर्ण आणि रौप्य दोन्ही पदकं भारताने पटकावली आहेत.
 
 
 
 
भारताच्या या अत्यंत प्रसिद्ध आणि प्रचंड लोकप्रिय असलेल्या दोन्ही खेळाडू महिला एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये आमने सामने आल्याने सामन्याचे महत्त्व वाढले होते. अंतिम लढतीमध्ये सायनाने २१-१८ आणि २३-२१ अशा गेममध्ये सिंधूचा पराभव केला आणि सुवर्ण पदक पटकावले. तर सिंधूनही उत्तम खेळी करत रौप्य पदक पटकावलं आहे.
२०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सायनाने सुवर्णपदक जिंकले होते, परंतु नंतर ग्लास्गोमध्ये चार वर्षांनी दुखापतीमुळे ती खेळू शकली नव्हती. या विजयामुळे भारताचे महत्व राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आणखीनच वाढले आहे.
@@AUTHORINFO_V1@@