कठुआ प्रकरणी जम्मू बार असोसिएशनची होणार चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |

बार काउन्सिल ऑफ इंडियाची माहिती



नवी दिल्ली : कठुआ हत्याकांडातील आरोपींच्या बाजूने आंदोलन करत असलेल्या जम्मू बार असोसिएशनची लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती बार काउन्सिल ऑफ इंडियाचे संचालक मनन कुमार मिश्रा यांनी आज दिली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी घोषणा केली असून या घटनेच्या सविस्तर चौकशीचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

कठुआ प्रकरणी आरोपींच्या सुटकेसाठी आंदोलन करत असलेल्या जम्मू बार असोसिएशनला तातडीने आपले आंदोलन मागे घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे. मिश्रा यांनी घटनेविषयी सविस्तर माहिती देताना, याविषयी चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच हे पथक कठुआ येथे जाऊन या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करेल, असे त्यांनी सांगितले. कठुआतील सर्व नागरिकांशी आणि जम्मू बार असोसिएशनच्या सदस्यांची देखील हे पथक चर्चा करेल असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर या घटनेचा आणि बार काउन्सिलच्या आंदोलनाचा सविस्तर अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.




कठुआ हत्याकांडामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींवार पोलिसांनी आरोपपत्र दाखल करू नये, यासाठी गेल्या आठवड्यात जम्मू बार असोसिएशनने जम्मू बंदची हाक दिली होती. तसेच जागोजागी निदर्शने सुरु केली. कठुआ प्रकरणी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जावे, अशी मागणी देखील असोसिएशनने केली. यानंतर मात्र घटनेची पार्श्वभूमीवर माहिती नसताना देखील संपूर्ण देशभरातील जम्मू बार असोसिएशनवर टीकेची झोड उठली होती. यावर न्यायालयाने देखील असोसिएशनची नेमकी बाजू काय आहे ? हे जाणून घेण्याचे निर्देश दिले होते.  
@@AUTHORINFO_V1@@