बलात्काऱ्यांना धर्म नसतो ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |


खरं तर लेखाचं नाव वाचून काही जणांच्या मनात नाना प्रश्न आणि कुशंका निर्माण होतील. काही जण तर लेखाच्या शीर्षकावरूनच हा लेख एखाद्या संघी, भक्त किंवा मुस्लीमविरोधकांनी लिहिला असावा, हे घोषित देखील करून टाकतील. तसेच वाचण्याचे कष्ट न घेता हा लेख एका विशिष्ट विचारसारणी पारड्यात (म्हणजे थोडक्यात उजवी विचारणीत) टाकून देतील, परंतु देशात सध्या काही स्वघोषित विचारवंतांकडून आणि सुशिक्षित तरुणाईकडून वातावरणच असे निर्माण केले जात आहे कि, त्यावरून बलात्कार करणाऱ्या जात-धर्म नसतो, या त्यांच्याच वक्तव्यावर विश्वास ठेवण जड जात आहे.
सध्या संपूर्ण देश कठुआ येथे झालेल्या सामुहिक अत्याचाराच्या घटनेमुळे हादरून गेला आहे. कठुआमधील काही नराधमांनी अवघ्या ८ वर्षांच्या मुलीवर केलेल्या अमानवीय अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मुळात ही घटनाच अशी आहे कि, 'भावना आणि सामाजिक' जाणीव जिवंत असलेल्या कोणाचा संताप अनावर व्हावा. आपला कसलाही दोष नसताना फक्त वासनांधांच्या वासनेला बळी पडलेल्या असिफाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळवून देणे हेच खऱ्या अर्थाने जिवंतपणाचे लक्षण देखील ठरेल. परंतु या पलीकडे ज्यांच्या मनात फक्त 'राजकीय आणि भारतीय समाजात फुट पाडण्याची भावना आहे, अशांच काय ? असा एक नवीन प्रश्न या असिफ प्रकरणामुळे समोर आले आहे. मुळातच असिफाबरोबर झालेली घटना ही अत्यंत हृदयद्रावक अशी आहे आणि याच घटनेचा फायदा घेऊन काही जणांकडून पुन्हा एकदा देशात 'असहिष्णुतेचे' वातावरण असल्याचे चित्र उभे केले जात आहे. काही विचारवंतांकडून, कलाकारांकडून आणि सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या तरुणाईकडून #JusticeForAshifa, #speakupindia, #NotInMyName अशा प्रकारच्या मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये नेहमी प्रमाणे हातामध्ये एक उपरोधक शब्दात लिहिलेली पाठी घेऊन हे सर्व जन झालेल्या घटनेवर आपला निषेध व्यक्त करत आहेत. परंतु यावर लिहिलेल्या मजकुरात मात्र हे लोक असिफा ही फक्त ८ वर्षाची मुलगीच नव्हती तर ती एक 'मुस्लीम' समुदायातील मुलगी होती आणि तिच्यावर एका 'मंदिरा'मध्ये अत्याचार करण्यात आला हाच मुद्दा ठळकपणे समाजासमोर मांडत असल्याचे दिसत आहेत. तसेच नेहमी 'We are Indian' असे म्हणारे हे लोक या घटनेसाठी स्वतःला किती लज्जित झालो आहोत हे सांगताना आपण 'भारतीय' नव्हे तर 'हिंदुस्तानी' असल्याची लाज वाटत आहे, असा उद्घोष यांनी सुरु केला आहे. म्हणजे असिफाच्या घटनेनंतर आपण भारतीय नसून हिंदुस्तानी असल्याचा साक्षात्कार यांना झाला आहे. तसेच निर्भयाप्रकरणी कधीही सरकारला जाब न विचारणारे हे लोक असिफाच्या घटनेसाठी मात्र सरळसरळ केंद्र सरकारला जबाबदार धरून या घटनेसाठी केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे स्वतःच घोषित करत आहेत.

बॉलीवूडकरांचा पाठींबा : 








काही सुज्ञ विचारवंतांची यावर मते :  







या घटनेची आणखी एक बाजू म्हणजे या मोहिमांनंतर 'not all hindu are repist' अशी अजून एक मोहीम सोशल मिडीयावर सुरु झाली आहे. ज्यामध्ये असिफाच्या आडून भारतातील एका विशिष्ट समाजावरच बलात्कारी असल्याचा अप्रत्यक्ष शिक्का मारू पाहणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जात आहे. 'भारतातमध्ये प्रत्येक जाती-धर्माच्या मुलींबरोबर अत्याचाराच्या घटना घडत आहेत, परंतु त्यांच्यासाठी देखील का आवाज उठवला जात नाही ?' असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. तर काही जणांनी भारतात हिंदू मुलींवर देखील अत्याचार होत आहेत, यामध्ये काही परधर्मीयांकडूनच हिंदू अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले जात असल्याचे पुराव्यासह म्हटले आहे, पण यावर कोणी का आवाज उठवत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु याला नेहमी प्रमाणे 'तोकडी' विचारसरणी म्हणून नेहमी प्रमाणेच दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे देशवासीयांनी असिफासाठी सुरु केलेली ही लढाई 'न्याया'साठीच आहे का ? असा प्रश्न निर्माण निर्माण होऊ लागला आहे.







नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतात प्रत्येक वर्षी जवळपास २० हजार बलात्काराच्या घटना घडतात. ज्यांची नोंद पोलीस रेकॉर्डमध्ये राहते, परंतु यामध्ये किती टक्के हिंदू, मुस्लीम, शीख अथवा ख्रिस्ती मुलींवर बलात्कार झाले याचे रेकॉर्ड मात्र ठेवले जात नाही. तसेच त्याची पाहणी देखील कोणी करत नाहीत. दिल्लीतील निर्भया प्रकरण देखील अशाच प्रकारे सर्व देशवासी न्यायासाठी रस्त्यावर उतरले होते, परंतु निर्भायाच्या जातीचा अथवा धर्माचा प्रश्न कोणीही उपस्थित केला नव्हता. परंतु यावेळी मात्र वारंवारपणे असिफाच्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांच्या धर्माचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. त्यामुळे अनेक वेळा जाती धर्माच्या भिंती तोडा असे म्हणाऱ्या याच लोकांच्या दहशतवाद आणि बलात्काऱ्यांना जात-धर्म नसतो, या वाक्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@