परकीय आक्रमण : भारतीय भाषा आणि विचारांवरही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह, श्री. मनमोहनजी वैद्य यांच्यासोबत गप्पा, शंकानिरसन व मार्गदर्शनाचा कार्यक्रम MahaMTB, विश्व संवाद केंद्र, आणि समविचारी संस्थांच्या माध्यमातून पुणे येथे झाला. या कार्यक्रमातील चर्चा, मनमोहनजींनी मांडलेले मुद्दे आणि त्या सगळ्याचं माझं आकलन या लेखात मांडण्याचा प्रयत्न करते.

आपण आता सगळेच जण सोशल मिडियाचा वापर अतिशय प्रभावी पणे करायला शिकलो आहोत. आपल्याला महत्त्वाचे वाटणारे, मनापासून पटलेले विषय आपण लिखाणाच्या किंवा forwards च्या माध्यमातून सतत समाजात प्रवाहित करत असतो. आपल्या सर्वांनाच followership असते.अगदी एक माणूस ते लाखो लोक आपल्या पोस्टस् वाचत असतात, शेअर करत असतात, त्यावरची त्यांची मते मांडत असतात. या लोकांना त्या विशिष्ट ‘व्यक्तिची Tribe’ म्हणण्याचा प्रघात आहे. हा शब्द negatively घेऊ नये. तर, आपला विचार, आकलन अधिकाधिक स्पष्टपणे आणि सुगमपणे या सर्व वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी योग्य मुद्दा उचलण्याची तर गरज आहेच परंतु नेमकी अशी शब्दरचना, शब्दांची सुयोग्य निवड हेही अतिशय आवश्यक आहे. आता 2 3 उदाहरणे पाहू.

आणि हा विषय मी का मांडतेय हेही या उदाहरणांतून स्पष्ट होईल. आता Nationalist म्हणजे राष्ट्रवादी हा शब्द पाहु. आपल्या सामान्य कल्पनेत राष्ट्रवादी म्हणजे देश एकसंध, सार्वभौम ठेवू पहाणारा राष्ट्रभक्त माणूस. परंतु हा शब्द युरोपियन राष्ट्रांत अश्या अर्थाने वापरित नाहीत. हिटलर, मुसोलिनी हे ‘राष्ट्रवादी’ होते. आपण तसे माथेफिरू, जिहादी, संहारक, Expansionists आहोत काय? मग Nationalist या शब्दाचा मूळ अर्थ माहिती असणारे किंवा जाणिवपूर्वक माहित करून दिलेले लोक या देशप्रेमी लोकांपासून अलग होतात.त्यांना टाळू पहातात.

तीच तर्हा Hinduism, Hindu ideologue या शब्दांची. हिंदू जीवनपद्धती अश्या अर्थाने ‘Hinduness’ असा शब्द वापरता येऊ शकतो. हिंदू जीवन हि एक अध्यात्मिक आयुष्यपद्धती आहे. तिला कोणत्याही एका जाती, पंथात बंद करता येवू शकत नाही. परमेश्वराशी एकरुपतेचा अनुभव तुम्हाला ज्या मार्गाने येतो तो तुमचा पंथ.कारण हिंदू जीवनपद्धती हि अतिशय उदार आहे. Hinduness is something one should experience.We believe in speritiual democracy.Ask other religions, if they feel the same… !!?? तुम्ही रामभक्त आहात आणि चर्चमधे जाता असं होत असतं.कधी ख्रिश्चन माणसाला राम,क्रुष्ण, किंवा देवीच्या मंदिरात पाहिलयं? Tolerance आणि सहिष्णुता हा आपला सहजभाव आहे.

या ‘Hindu “ism” मुळे हिंदुतत्व संकुचित स्वरुपात मांडलं जाऊ लागलं.त्याचा मूळ विस्तार, संपूर्ण आवाका, पूर्णपणे दुर्लक्षिला गेला.भारतीय भाषांतून अभारतीय भाषांमध्ये रुपांतरे करताना मूळ संकल्पनाच नेस्तनाबूत केल्या गेल्या. कधी जाणुनबुजुन तर कधी लेखकाच्या सिमित आकलनशक्तीमुळे हा प्रमाद घडला. वारंवार घडत राहिला.आणि म्हणूनच भारतीय परिभाषा समजून लिखाण करायला हवे. शब्दांचे मूळ अर्थ, त्याचे परिणाम सखोलपणे समजून ते समाजात प्रवाही करायला हवे.याबाबत चिनी लोकांची भुमिका वाखाणण्याजोगी आहे. ते चिनी भाषेतच व्यवहार करतात कारण ते म्हणतात, आम्हाला जे म्हणायचे आहे ते तुमच्या भाषेत मांडताच येणार नाही कारण आमच्या संज्ञा, संकल्पना मांडायला तुमच्या भाषेत शब्दच उपलब्ध नाहीत.आणि एका अर्थाने ते खरेही आहे. आपणही काहीवेळा मराठी, इंग्रजी भाषांतर करताना त्या अर्थाच्या जवळपासचा शब्द वापरतो.पण नवख्या वाचकाला मूळ अभिप्रेत अर्थ किंवा भाव तस्साच्या तसा समजेलच असे नाही. तर यामुळेच भारतीय मानसिकतेचे, या जीवनपद्धतीचे अभारतीयांनी केलेले वर्णन अनेकदा अपूर्ण, अयोग्य अथवा चुकिचे होते.


अजून एक छान उदाहरण.वामपंथी नाही तो दक्षिणपंथी. आणि Rightist नाही तो leftist. हिसुध्दा अशीच एक भारतीयांवर लादलेली संकल्पना. आर्थिक द्रुष्ट्या मध्यमवर्गीय अशी फळीच रशिया आणि युरोपीय देशांत त्या काळात नसल्याने त्यांना समजणार्या, त्यानी विकसित केलेल्या संकल्पनांची मॉडेल्स त्यांनी इथे रुजविण्यास सुरुवात केली त्यामुळे झालेले हे गोंधळ आहेत. अन्यथा सामान्य देशप्रेमी भारतीयाला लेफ्ट, राईटने काय फरक पडतो?मनमोहनजी म्हणतात तसं, वामपंथी, दक्षिणपंथी या संज्ञा आम्ही जाणत नाही; कारण आम्ही “रामपंथी”.


अशी हि सगळी झालेली शब्दांची, संकल्पनांची भेसळ हळूहळू भारतीय समाजातून साफ करायला हवी.आपल्या समाजमनाचा साकल्याने अभ्यास करून भारतीय जीवनपद्धतीमुळे समाजात समतेचा, बंधुत्वाचा, आणि एकंदरितच जीवनाचा जो ‘तोल’(balance) सांभाळला जातो, त्याचा पुरस्कार करायला हवा. “भारत” मांडायला हवा.

- अमिता आपटे 
@@AUTHORINFO_V1@@