आठ प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणुक बिनविरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |
 
 

 
 

भाजपाला ४ शिवसेनेला ४ जागा
 

मुंबई  :  मुंबई महानगरपालिकेच्या १७ प्रभाग समित्यांपैकी ८ प्रभाग समित्यांची निवडणूक गुरुवारी संपन्न झाल्या होत्या. आजही ८ प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली यामध्ये भाजपला चार आणि शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. तर उर्वरित एक जागेसाठी १९ एप्रिलला निवडणूक होणार आहे.
 
 
आज झालेल्या निवडणुकीत ‘जी/उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्‍या मरिअम्‍माल मुथुरामलिंगाम थेवर, ‘एच/पूर्व आणि एच/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे सदानंद परब, ‘के/पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे सुनिल यादव, ‘के/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे योगीराज दाभाडकर, ‘एल’ प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेना पुरस्‍कृत अपक्ष नगरसेवक किरण ज्‍योतीराम लांडगे, ‘एम/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे राजेश ओमप्रकाश फुलवारीया, ‘एन’ प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्‍या रुपाली सुरेश आवळे, ‘एस’ आणि ‘टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या सारि‍का मंगेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ‘जी/उत्तर’ प्रभाग, ‘एच/पूर्व’ आणि ‘एच/पश्चिम प्रभाग, ‘के/पूर्व’ प्रभाग, ‘के/पश्चिम’प्रभाग या ४ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कामकाज सांभाळले, तर ‘एल’ प्रभाग, ‘एम/पश्चिम’ प्रभाग, ‘एन’ प्रभाग, ‘एस’ आणि ‘टी’ या ४ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर हेमांगी वरळीकर यांनी कामकाज पाहिले. उर्वरित ‘एम/पूर्व’ प्रभाग समितीची निवडणूक शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर हेमांगी वरळीकर या उपस्थित राहणार आहेत. 
 
 

 
 
 
एम/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे राजेश ओमप्रकाश फुलवारीया यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना उपमहापौर हेमांगी वरळीकर.
 
 
 
 
 
के/पूर्व’ प्रभाग समितीअध्यक्षपदी भाजपचे सुनिल यादव यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांचे अभिंनदन केले. यावेळी उपस्थित भाजपंच्या नगरसेविका उज्वला मोडक,नगरसेवक मुरजी पटेल , उपायुक्त आनंद वागराळकर.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@