मंत्रालयासमोर भाजीपाला फेकून शेतकऱ्यांचे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |


पालिका अधिकारी विक्रीस अटकाव करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप


मुंबई : कांदिवली परिसरात आठवडी बाजार पालिका आधिकारी अटकाव करत असून तसेच आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या रागाचा उद्रेक शुक्रवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पहायला मिळाला. पालिका अधिकाऱ्यांचा होणारा अटकाव आणि न मिळणारा भाव याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आपला भाजीपाला फेकला. कांदा, वांगी, बटाटा, मिरच्या, लिंबू असा माल मंत्रालयाच्या दारात फेकून आंदोलक शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी मुंबईत घेऊन आले होते. मात्र, कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांना बसण्यास मनाई केली. दरम्यान, परराज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना पालिकेचे अधिकारी मज्जाव करत नसून त्यांना आपला माल विकण्याची परवानगी दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. राज्यातील शेतकऱ्यांना आपला माल विकण्यास बसू दिले जात नाही, उलटपक्षी शेतकऱ्यांना कारागृहात डांबण्याची धमकी दिली जाते, अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली. याच्याच निषेधार्थ या शेतकऱ्यांनी आपल्याकडे पिकवलेला शेतमाल मंत्रालयाच्या दारात फेकून दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना त्वरित ताब्यात घेतले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@