भाला फेक खेळात भारताला पहिले सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
 
गोल्ड कोस्ट : भाला फेकमध्ये भारताला आज सुवर्ण पदक मिळाले आहे. नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे. हे सुवर्ण पदक मिळवत नीरज चोप्रा याने २१ वे सुवर्ण पदक भारताच्या खात्यात जमा केले आहे. नीरज चोप्रा हा पहिला भारतीय आहे ज्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भाला फेक या स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.
 
 
 
८६.४७ मीटर अंतरावर नीरज चोप्रा याने नेम साधला आहे. आजच्या दिवसाचे हे चौथे पदक ठरले आहे. आज सकाळी मेरी कॉम हिने सुवर्ण पदक जिंकत दिवसाला सुरुवात केली. त्यानंतर एकामागून एक सुवर्ण पदक आज भारताच्या खात्यावर जमा झाली आहेत. बॉक्सर गौरव सोलंकी आणि नेमबाज संजीव राजपूत यांनी दोघांनी आज सुवर्ण पदक जिंकले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@