नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती आहे. या दिनाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत अभिवादन केले आहे.
 
 
 
  
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे यावेळी उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@