गौरव सोलंकी आणि संजीव राजपूत यांची देखील सुवर्ण कमाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
गोल्ड कोस्ट : बॉक्सर गौरव सोलंकी आणि नेमबाज संजीव राजपूत यांनी दोघांनी आज सुवर्ण कामगिरी करत भारताला १९ वे आणि २० वे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सर मेरी कॉमनंतर सलग १९ वे सुवर्ण पदक गौरव सोलंकी याने बॉक्सिंगमध्ये मिळविले आहे. ५२ किलो वजनी गटात गौरव सोलंकी याने हे पदक मिळविले आहे.
 
 
 
तर नेमबाज संजीव राजपूत याने ५० मीटर रायफल शुटींग प्रकारात २० वे सुवर्ण पदक मिळविले आहे. त्यामुळे आता भारताकडे सुवर्ण पदकांची २० संख्या झाली असून १३ रजत तर १४ कांस्य पदक झाली आहेत. बॉक्सर मनीष कौशिक याने देखील आज बॉक्सिंगमध्ये ६० किलो वजनी गटात रजत पदक मिळविले आहे. बॉक्सर अमित पंचाल याने देखील रजत पदक जिंकले आहे. ४६-४९ किलो वजनी गटात त्याने हे पदक जिंकले आहे.
 
 
 
 
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यावर्षीची भारताची अतिशय उत्कृष्ट कामगिरी मानली जात आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच भारताने इतक्या मोठ्या प्रमाणात पदक मिळविली आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सगळ्या खेळाडूंना ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 
@@AUTHORINFO_V1@@