स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक, दिव्‍यांग बांधव, गुणवंत विद्यार्थी यांना ताडोबाची निःशुल्‍क सफारी उपलब्‍ध करावी - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
वनमंत्र्यांनी घेतला ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाचा आढावा
 

चंद्रपूर :  ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाची वेबसाईट अद्ययावत करावी व त्‍यात ताडोबा अभयारण्‍याशी संबंधित वैशिष्‍टयपूर्ण माहिती देण्‍यात यावी तसेच स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक, दिव्‍यांग बांधव, गुणवंत विद्यार्थी यांना रोज एक कॅन्‍टर सफारी निःशुल्‍क उपलब्‍ध करावी असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
 
 
 
१३ एप्रिल रोजी चंद्रपूर येथे नियोजन भवनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाशी संबंधित आढावा बैठक संपन्‍न झाली. या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रकल्‍पाच्‍या कामाकाजाचा आढावा घेतला. वनविभागातर्फे गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत वनपर्यटन किती वाढले याबाबतचे सादरीकरण केले. रिसोर्ट मालक व जिप्‍सी चालक यांच्‍या समस्‍या वनमंत्र्यांनी जाणून घेतल्‍या.
 
 
ताडोबाकडे जाणा-या रस्‍त्‍यांची दुरूस्‍ती तातडीने करण्‍यात यावी. एक कॉल सेंटर सुरू करून त्‍या माध्‍यमातुन पर्यटकांना संपूर्ण माहिती मिळण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येईल व पर्यटकांना आपल्‍या समस्‍या सुध्‍दा सांगता येईल अशी व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले. गाईड व वाहन चालकांना योग्‍य प्रशिक्षण देण्‍याचे निर्देश यावेळी वनमंत्र्यांनी दिले. ज्‍यांनी अनाधिकृत रिसोर्टस बांधले आहेत त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍याचे संकेत वनमंत्र्यांनी दिले. सेवानिवृत्‍त वनकर्मचारी व त्‍यांचे कुटूंबिय तसेच आदिवासी विद्यार्थ्‍यांना निःशुल्‍क सफारीचा लाभ देण्‍याचे निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@