डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |


 

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील स्मारक १४ एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेची पाहणी केली.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान,स्मारकाचे वास्तू विशारद शशी प्रभू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सचिव नागसेन कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या जागेची आणि प्रतिकृतीची पाहणी केली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर स्मारकाच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्यदिव्य असे स्मारक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्मारकाच्या उंचीमुळे या वांद्रे वरळी सी लींकवरून देखील दर्शन घेता येणार असल्या मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दरम्यान, स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या असून स्मारकाचे काम नियोजित वेळेत करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@