डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक संघर्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |

अस्पृश्यता निवारण हेच जीवनध्येय
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना
जनजागृतीसाठी सुरू केले वृत्तपत्र

 

अस्पृश्यता निवारण हेच आपले जीवनध्येय डॉ. बाबासाहेबांनी निश्‍चित केले होते, ते साध्य करण्यासाठी त्यांना धार्मिक संघर्ष करावा लागला; तसाच सामाजिक आणि राजकीय संघर्षही करावा लागला. अस्पृश्यता - मुक्तीचा लढा एकाचवेळी तीन आघाड्यांवर डॉ. बाबासाहेब लढत होते. धार्मिक संघर्ष अगोदर, नंतर सामाजिक आणि शेवटी राजकीय असे तीनही लढे एकमेकांत गुंतलेले, एकमेकांवर अवलंबून आणि एकमेकांना पूरक राहिले आहेत.
 
हिंदू समाज ही अस्तित्वात असलेली संकल्पना आहे. अस्पृश्य समाजातील एका गटाला डॉ. बाबासाहेबांनी हिंदू समाजाबाहेर काढले असले तरी, हिंदू समाज हिंदू या नावानेच अस्तित्वात आहे. विषमतेच्या समस्या १९२७ साली जशा होत्या तशाच आजही आहेत. शहरी भागात व शहरी जीवनाच्या संपर्कात असणाऱ्या खेड्यात जन्मजात विषमतेची समस्या १९२७ इतकी तीव्र नसेल कदाचित पण ही समस्या संपली आहे असं नाही. विषमतेची समस्या जोवर आहे, अस्पृश्यता जोवर आहे व सामान्य नागरी हक्कांपासूनही समाजातील मोठा गट वंचित आहे तोवर या जाहीरनाम्याचं महत्व कायम राहणार आहे.
 
अस्पृश्यता निवारण हेच आपले जीवनध्येय डॉ. बाबासाहेबांनी निश्‍चित केले होते, ते साध्य करण्यासाठी त्यांना धार्मिक संघर्ष करावा लागला; तसाच सामाजिक आणि राजकीय संघर्षही करावा लागला. अस्पृश्यता - मुक्तीचा लढा एकाचवेळी तीन आघाड्यांवर डॉ. बाबासाहेब लढत होते. धार्मिक संघर्ष अगोदर, नंतर सामाजिक आणि शेवटी राजकीय असे तीनही लढे एकमेकांत गुंतलेले, एकमेकांवर अवलंबून आणि एकमेकांना पूरक राहिले आहेत. अस्पृश्य वर्ग हिंदू समाजरचनेचा अविभाज्य भाग राहत आला आहे. अस्पृश्यता मुक्तीचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ हिंदू समाजरचनेत बदल घडवून आणून अस्पृश्यांना मुक्त करणे. दुसरा अर्थ अस्पृश्यांना हिंदू समाजरचनेतून बाहेर काढून त्यांना अस्पृश्यतेच्या गर्तेतून मुक्त करणे. डॉ. बाबासाहेबांचा सामाजिक संघर्ष पहिल्या प्रकारापासून सुरू होऊन दुसर्‍या प्रकारात त्याचा अखेर झालेला दिसतो.
 
पहिली भूमिका ही हिंदू समाजसुधारणेची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेबांची ही भूमिका बदलत गेली आहे. हिंदू धर्माचा त्याग करतांना हिंदू समाजरचनेचाही त्याग करण्याची भूमिका होती, पण हिंदू कोड बिलाच्या वेळी पुन्हा सुधारक हिंदूने उचल खाल्ली हे लक्षात येतं. आपले विचार मांडण्यासाठी व सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ नावाचे पत्र १९२० साली सुरू केले. त्याच्या पहिल्याच अंकात त्यांनी हिंदू समाजरचनेविषयी आपले विचार मांडले आहेत. ते म्हणतात, हा देश केवळ विषमतेचे माहेरघर आहे. हिंदू धर्मात समाविष्ट होणार्‍या जाती उच्च-नीच भावनेने प्रेरित झालेल्या आहेत. हिंदू समाज एक मनोरा आहे व एक जात म्हणजे त्याचा एक मजलाच आहे, पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या मनोर्‍यास शिडी नाही. ज्या मजल्यावर ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यावर त्यांनी शेवटचा श्वासही घ्यावा. अस्पृश्य वर्गासाठी डॉ.बाबासाहेबांनी बहिष्कृत असा शब्द वापरला आहे. हा वर्ग हिंदू समाजाचाच एक भाग आहे अशी त्यांची भूमिका आहे. अस्पृश्यतेचा या समाजावर कशा प्रकारचा अतिघोर परिणाम झालेला आहे हे सांगतांना ते लिहितात, ‘दौर्बल्य, दारिद्रय व अज्ञान या त्रिवेणी संगमाने हा अफाट बहिष्कृत समाज वाहवला आहे. दीर्घकाळ हिनता त्यांना मागे खेचीत आहे. ज्ञानमंदिरात सर्वच ठिकाणी अस्पृश्यांचा प्रवेश होतो असे नाही. दारिद्रयाची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारलेला असल्याने पैसा मिळविण्यास हवी तेवढी संधी किंवा मोकळीक नाही.’ अस्पृश्यांना मानवी अधिकार मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी ९ मार्च १९२४ रोजी डॉ. बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या विनंतीपत्रात त्यांनी हिंदू समाजाची तीन भागांत विभागणी केली आहे.
 
१) ब्राह्मण वर्ग, २) ब्राह्मणेतर वर्ग, ३) बहिष्कृत वर्ग.
 
बहिष्कृत वर्गाविषयी ते सांगतात - ज्या हिंदू धर्माचे बहिष्कृत लोक घटत आहेत, त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्यमात्राचे संघटन दोन आदितत्वांना धरून झालेले आहे. एक जन्मसिध्द योग्ययोग्यता व दुसरे जन्मसिध्द पवित्र पवित्रता... ही जन्मसिध्द व्यवस्था काही लोकांना सुखकर तर काही लोकांस दु:सह होऊन बसली आहे. या जन्मसिध्द व्यवस्थेमुळे भ्रष्ट झालेला पहिल्या वर्गातील माणूस तिन्ही लोकी श्रेष्ठच राहतो. ब्राह्मणेतर हा दुसरा वर्ग फक्त धार्मिक बाबतीत कनिष्ठ असून त्यांना विद्या व द्रव्य मिळविण्याचे मार्ग मोकळे आहेत व विद्या व वित्त यांच्या जोरावर ब्राह्मणेतर जे आज खालचे जे उद्या सर्वात वरचे होणार आहेत, असे बाबासाहेबांचे मत होते.(या उलट स्थिती मात्र बहिष्कृत लोकांची आहे. जन्मसिध्द अपवित्रता व जन्मसिध्द अयोग्यता या दोहोंच्या मार्‍यात सापडल्यामुळे या वर्गाची स्थिती फारच शोचनीय झालेली आहे. अनेक दिवसांपासून स्वत:स अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे नैतिकदृष्टया त्यांच्यातील आत्मबल व स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे, ती अगदी लयास गेली आहेत.) महाड धर्मसंघर्षाप्रसंगी त्यांनी हिंदू समाजास सुधारणेसंबंधी विविध मार्गांनी आवाहन केले आहे. २० मे १९२७ च्या बहिष्कृत भारतमधील अग्रलेखाचे शीर्षक आहे’ महाड येथील धर्मसंघर्ष व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी’ या लेखातील प्रतिपादन प्रामुख्याने अस्पृश्य वर्गासाठी असले तरी, सवर्णांना त्यात भरपूर इशारे आहेत.
 
डॉ. बाबासाहेब लिहितात, स्पृश्य हिंदूंचे लोकमत अस्पृश्यता निवारण्यास प्रतिकूल आहे, ही गोष्ट अस्पृश्य लोकांनी ध्यानात घेतली पाहिजे. ते अनुकूल कसे करता येईल? हा अस्पृश्य जनतेपुढे मोठा प्रश्‍न आहे...स्पृश्य हिंदूंच्या भावना दगडासारख्या कठीण का झाल्या आहेत, याचे पूर्ण आकलन होणे आवश्यक आहे. बहिष्कृत वर्ग हा हिंदू समाजाचाच भाग आहे ही जोवर त्यांची भूमिका होती, तोवर ते सर्व हिंदू समाजाचाच विचार करीत असत. महाडच्या २५-२६ डिसेंबर १९२७ रोजी सत्याग्रहींच्या सभेत डॉ.बाबासाहेब यांनी हिंदूमात्राच्या जन्मसिध्द हक्कांचा जाहीरनामा सर्वांपुढे मांडला. हा जाहीरनामा मांडताना ते म्हणतात, सामाजिक अन्याय, धार्मिक ग्लानी, राजकीय अवनती आणि आर्थिक गुलामगिरी यांच्यामुळे राष्ट्र कसे अधोगतीस जाते याचे सांप्रतचा हिंदू समाज हे एक ठळक व अनुकंपनीय उदाहरण आहे; असे या सभेचे मत आहे. हिंदू समाजास अशी घोर दशा प्राप्त होण्याचे मुख्य कारण असे की बहुजन समाजाने मनुष्यमात्राचे जन्मसिध्द हक्क कोणते याची जाणीव करून घेण्याची तत्परता दाखवली नाही आणि ते अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली नाही तसेच स्वार्थसाधू लोकांच्या कपटकारस्थानांना आळा घातला नाही. आपले जन्मसिध्द हक्क समजून घेणे, त्याचे आपद्प्रसंगी संरक्षण करणे व परस्परांमधील व्यवहारात त्याची पायमल्ली होणार नाही याविषयी काळजी घेणे हे समाजातील प्रत्येक मनुष्यमात्राचे परमकर्तव्य आहे.
 
हिंदू समाज ही अस्तित्त्वात असलेली संकल्पना आहे. अस्पृश्य समाजातील एका गटाला डॉ. बाबासाहेबांनी हिंदू समाजाबाहेर काढले असले तरी, हिंदू समाज हिंदू या नावानेच अस्तित्त्वात आहे. विषमतेच्या समस्या १९२७ साली जशा होत्या तशाच आजही आहेत. शहरी भागात व शहरी जीवनाच्या संपर्कात असणार्‍या खेड्यात जन्मजात विषमतेची समस्या १९२७ इतकी तीव्र नसेल कदाचित पण ही समस्या संपली आहे असं नाही. विषमतेची समस्या जोवर आहे, अस्पृश्यता जोवर आहे व सामान्य नागरी हक्कांपासूनही समाजातील मोठा गट वंचित आहे तोवर या जाहीरनाम्याचं महत्त्व कायम राहणार आहे. हिंदू समाजाला सामाजिक समतेच्या दिशेनं जाण्याचं पथप्रदर्शन हा करीत असतो. यात हिंदूमात्रांच्या जन्मसिध्द अधिकारांची मांडणी डॉ.बाबासाहेबांनी केली आहे. फक्त अस्पृश्यांच्या जन्मसिध्द अधिकाराची भाषा ते करीत नाहीत. लढा अस्पृश्यता मुक्तीचा आहे, पण हक्काची मागणी समग्र हिंदू समाजासाठी आहे.
 
याच जाहीरनाम्याचे म्हणजे जन्मसिध्द हक्कांचे प्रतिबिंब पुढे भारताच्या राज्यघटनेत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या राज्यघटनेने सर्वांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, भेदभावरहित व्यवहाराची हमी, संधीची समानता, जन्म-जात, वंश, भाषा इत्यादी घटकांच्या आधारे कोणताही भेदभाव न करण्याची हमी अशी वैशिष्ट्ये राज्यघटनेची सांगता येतील. हिंदूमात्राच्या जन्मसिध्द अधिकाराच्या जाहीरनाम्याचे स्वच्छ प्रतिबिंब कोणीही राज्यघटनेत पाहू शकतो. अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्याची ही जी भूमिका आहे ती हिंदू समाजाशी संघर्ष करण्याची आहे, परंतु ही भूमिका हिंदू समाजाला तोडण्याची नाही. आंदोलन करून कायदेशीर अधिकार मिळविता येतात, पण आंदोलन करून लोकांच्या व्यक्तिगत आचरणात किती बदल घडवून आणता येतो हा प्रश्‍न तपासून पाहण्यासारखा आहे.
 
 
- दिनेश दगडकर
९९२२९१९४४६
 
@@AUTHORINFO_V1@@