डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |

उत्कृष्ट चिंतक आणि प्रभावी वक्ते
भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी
शिक्षणातून परिवर्तनावर विश्‍वास
देशहिताचाच केला सदैव विचार
 

आपल्याला ठाऊक आहे की, घटना समितीने २ वर्षे ११ महिने आणि १६ दिवस काम केले होते. या समितीची ११ अधिवेशने झाली. २६ नाव्हेंबर १९४९ रोजी आजची आपली राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. या घटना (मसुदा) समितीचे चेअरमन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काम पाहिले. त्यांनी मुंबईच्या सिडनहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. मुंबईच्या विधानमंडळात असताना त्यांची विधानमंडळातील अर्थसंकल्पावरील भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. डॉ. आंबेडकर हे क्रियाशील अर्थतज्ज्ञ होते. देशातील अर्थविषयक प्रश्‍नांची कुशल आणि कार्यक्षम हाताळणी करण्यासाठी आवश्यक रचना निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
 
प्रत्येक व्यक्ती समोरच्या व्यक्तीला आपल्या नजरेतून पाहत असतो. अशा एकांगी दृष्टीमुळे अनेक राष्ट्रपुरुष एकेका जाती-जमातीत बंदिस्त झाले आहेत. दुर्दैवाने डॉ. आंबेडकरांनाही आपल्या समाजाने केवळ दलितांपुरतेच मर्यादित ठेवले. ज्या महामानवाचे विचार अखिल भारताला गवसणी घालणारे होते, त्या महापुरुषाला केवळ दलित नायक म्हणून समोर आणणे चुकीचे आहे. त्यात सर्वांना राज्यघटनेचे शिल्पकार, घटना निर्माते एवढीच ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देण्यात येते, परंतु डॉ. आंबेडकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते एक थोर अर्थचिंतक, कृषीतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व घटनाकार आहेत. या दृष्टीने त्यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यातून आपणांस त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख पटेल.
 
घटना समितीपुढे २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी डॉ. बाबासाहेबांचे समारोपाचे भाषण झाले. ते भाषण सर्व भाषणांसारखेच उत्कृष्ट आहे. देशहिताची तळमळ, विचारांची सुस्पष्टता आणि शाश्‍वत विचारांची मांडणी यादृष्टीने हे अद्वितीय म्हटले पाहिजे. भारतातील १० अप्रतिम भाषणात या भाषणाची गणना करावी लागेल. राज्यघटना हा अपरिवर्तनीय दस्तावेज नव्हे किंवा तो धार्मिक ग्रंथही नव्हे तर येणार्‍या प्रत्येक पिढीत त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याचा अधिकार आहे आणि बाबासाहेबांनी तो मान्य केलेला आहे. त्यांनी ७० वर्षांपूर्वी जे बोलून दाखवले ते आता अनेक घटनांच्या स्वरुपात समोर येत आहे. बाबासाहेबांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. बाबासाहेबांच्या मते, शिक्षक राष्ट्राचा सारथी आहे. कारण, शाळा हे सुसंस्कृत मनाचे नागरिक निर्माण करणारे पवित्र तिर्थ आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याकरिता कृषी क्षेत्राशी संबंधित तांत्रिक संस्थांची निर्मिती करणे हे बाबासाहेबांचे चिरस्मरणीय कार्य आहे.
 
 
 
- सिध्देश्‍वर लटपटे
अ.भा.वि.प.महानगर विस्तारक (८३९००२२८३०)
 
@@AUTHORINFO_V1@@