मेरे भीमजैसा सितारा नही देखा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018   
Total Views |

जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
झिजून जिवाचं रान माझ्या भीमानं केलं...


बाबासाहेबांच्या विचारांनी सूर्याच्या किरणांसारखे सर्वदूर पसरून समाजाला शाश्वत मानवतेचे जगणे शिकवले. कितीतरी घटना आहेत. त्यांपैकी एक सत्य घटना. एका मोठ्या प्रतिष्ठित महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे प्राध्यापक अर्जुन खरात यांचे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात द्यायलाच हवे. नेवासा औरंगाबाद इथला हा तरूण. तथाकथित सामाजिक श्रेणीत अनुसूचित जातीमधील त्याचा जन्म. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरावर खर्‍या अर्थाने दुदैवीपणाने मागासवर्गातच मोडणारे. अर्जुन सांगतात, ’’नेवाश्याला आई दिवसभर रानात कामाला जायची. लाकड, कापलेले गवत घेऊन बाजारात विकायला न्यायची. घरात अठराविश्व दारिद्र. सगळ्याच गोष्टींची कमतरता. आई त्या दिवसांमध्येही म्हणायची की, ‘‘अर्जा, तू बाबासाहेबांसारखा गॉटमॅट बोलायला शिक!’’ त्यावेळी मला बाबासाहेबांचे आभाळाएवढे काम खर्‍या अर्थाने माहिती नव्हते. पण, प्रतिकूल परिस्थितीतही ‘गॉटमॅट’ बोलता यावे म्हणून मी शिकण्याचा मनापासून प्रयत्न केला. इतका की आज महाविद्यालयामध्ये इंग्रजीचा असिस्टंट प्रोफेसर आहे.’’ अर्जुन यांच्या आईने बाबासाहेबांना एकदाच पाहिले होते. लहाणपणी ती बाजारात लाकडं-गवताचे भारे घेऊन बसली होती आणि बाबासाहेब सुटाबुटात चालले होते. बरोबरच्या माणसाशी इंग्रजी - आईच्या भाषेत ‘गॉटमॅट’ बोलत होते. तोपर्यंत समाजात असे कपडे घालणारा, रूबाबात आत्मविश्वासाने विदेशी भाषा बोलणारा माणूस असू शकतो यावर कुणाचा विश्वास बसूच शकत नव्हता. असो. त्यापूर्वी आईने बाबासाहेब वाचले नव्हते की त्यांची भाषणं ऐकली नव्हती. फक्त त्यांना पाहिले होते. बाबासाहेबांना पाहूनही त्या आईला आपल्या मुलाने आयुष्यात कुणीतरी बनावे असे वाटले होते. अर्जुन यांच्या आईला बाबासाहेबांमुळे जे वाटले ते वाटणे गरजेचे आणि महत्त्वाचे होते. माणसाला माणुसकी दाखवणारे बाबा महान होतेच. बाबासाहेबांच्या क्रांतीत कुठेही रक्तपाताचे नामोनिशाण नाही. बाबासाहेबांचे मत होते की, सामाजिक क्रांती तेव्हाच महत्त्वाची असते, ज्यावेळी ती न्यायावर आधारित असते आणि तिला राजकीय आणि सामाजिक नीतिमत्तेचे अधिष्ठान असते. बाबांनी संघर्ष केला. पण, त्या संघर्षाची धार कधीही समाजाविरोधात नव्हती. तो संघर्ष न्यायावर आधारित होता. संघर्ष किंवा आंदोलनं, मोर्चामुळे समाजाचे नुकसान, मग ते आर्थिक असू दे, की राजकीय, ते होता कामा नये यावर बाबासाहेबांचा कटाक्ष होता. त्यामुळेच महाडच्या चवदार तळ्याचा किंवा काळारामसत्याग्रह असू दे किंवा बौद्घ धर्माची दीक्षा घेणे असू दे, बाबांनी रक्ताचा एक थेंबही सांडू दिला नाही. आज आंदोलनाच्या नावावर बंद, जाळपोळ, दगडफेक वगैरे केली जाते. देश बंद ठेवून देशाचे कोट्यवधींचे नुकसान केले जाते. हे सगळं आज बाबा असते आणि त्यांनी पाहिले असते तर? तर बाबा नक्कीच दुःखी झाले असते. बाबांना ज्यामुळे दु:ख झाले असते, त्या गोष्टीबद्दल आपण जागृत होऊन विचार करायलाच हवा.

भीमआमचा तारा आहे, त्याच्या विचारप्रकाशात आम्ही जगतो.

नजारों मे नजारा देखा, ऐसा नजारा नहीं देखा,
आसमान मे जब भी देखा
मेरे भीमजैसा सितारा नही देखा
त्यांनी लिहिलेल्या संविधानावर देश चालतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर म्हणाले, ‘‘देशात संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधान देशाचा पवित्र धर्मग्रंथ आहे.’’ त्यामुळेच की काय, २०१४ साली भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेत आली, तेव्हा महामानव परमपूज्य बाबासाहेबांच्या कार्याला आणि विचाराला स्मरून भारताची शासनपद्धती कामकरू लागली. पण, असे असतानाही कॉंग्रेससारखा पक्ष ज्यावेळी आपण दलित समाजाचे मसीहा आहोत, असा थाट करतो, तेव्हा बाबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेब म्हणाले होते की, ‘‘कॉंग्रेस हे जळकं घर आहे.’’ कारण, बाबासाहेबांनी आयुष्यभर दलित, शोषित, वंचितांसाठी, समाजातल्या महिलांसाठी कल्याणाचे मार्ग खुले करण्याचा प्रयत्न केला. पण, कॉंग्रेसला ते नकोच होते. याला इतिहास साक्षी आहे की, कॉंग्रेसच्या त्याकाळच्या नेत्यांनी बाबासाहेबांना कसे वागवले. कॉंग्रेसने बाबासाहेब राजकारणात जिंकू नयेत म्हणून कूटनीती करत बाबासाहेबांना कॉंग्रेसने दोनदा अनुक्रमे मुंबईं आणि भंडारदर्‍याच्या निवडणुकीत हरवले. तसेही बाबासाहेबांनी सत्तेसाठी कधीही कॉंग्रेसची हाजीहाजी केली नाही. ते खर्‍या अर्थाने सायबांचा सायब बाबासाहेब होते. त्यांच्या ‘व्हॉट कॉंग्रेस ऍण्ड गांधी हॅव्ह डन विथ अनटचेबल्स’ या पुस्तकात त्यांनी दलित समाजाबद्दल कॉंग्रेसच्या मनात नसलेले प्रेम, माणुसकी आणि वर ‘आम्हीच कसे दलितांचे कैवारी’ असे म्हणत कॉंग्रेसने केलेली नाटकं खोटारडेपणा याबद्दल लिहिले आहे. काय केले हो कॉंग्रेसने? भाजप सत्तेत आल्यानंतर इंदू मिलची जमीन असू दे, की बाबासाहेबांच्या वास्तव्याने पवित्र झालेले लंडनचे घर असू दे, दोन्ही गोष्टी समाजासाठी पवित्र आहेत. पण, सातत्याने सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसने त्यांच्या कालावधीत का नाही या गोष्टी केल्या? कारण, त्यांना ते करायचेच नव्हते. ज्या कॉंग्रेसने बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांना दुःख दिले, ती कॉंग्रेस बाबासाहेबांच्या नंतर समाजाला काय सुख देणार? दलितांच्या घरी जाऊन रोटी खाण्याचे नाटक करणे म्हणजे आम्ही दलितांसाठी खूप काही केले अशी फालतू मानसिकता कॉंग्रेसची आहे. याउलट ‘एक गाव, एक पाणवठा, एक स्मशान’ घेऊन, भाजपची अंतर्गत विचारधारा काम करत आहे. यापूर्वी कॉंग्रेस सरकार ज्या योजना दलितांसाठी असतील त्या योजनांनाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायची. मात्र, त्यानंतर भाजप सत्तेवर आला आणि कित्येक योजना डॉ. बाबासाहेबांच्या नावाने सुरू झाल्या. त्यांपैकी ’भीमऍप’ तर गरीब असो की श्रीमंत, कोणत्याही जातीपातीचा असो, त्याला मोबाईलहून पैशाचे व्यव्हार करायचे तर बाबासाहेबांचे नाव घ्यावेच लागेल. बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘सत्ताधारी बना.’’ आज भाजपच्या सत्तेत रामनाथ कोविंद राष्ट्रपती आहेत. महाराष्ट्राकडे पाहिले तर रामदास आठवले, दिलीप कांबळे, अमर साबळे, भाई गिरकर सत्तेच्या राजकारणात आहेत. समाजातील कार्यक्षम नेतृत्वाला खर्‍या अर्थाने भाजपने स्थान दिले आहे.


जरा मागे जाऊ, बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान कॉंग्रेसच्या राज्यातही होते. पण, याच कॉंग्रेसने संविधानाने दिलेल्या लोकशाहीला सारत, बाबासाहेबांच्या विचाराला नाकारत, देशावर १९७५ साली आणीबाणीची हुकुमशाही लादली. कॉंग्रेस हे विसरली म्हणजे विसरली नसेलच तसे नाटक करत आहे. पण, हुकूमशाही करत आणीबाणी लादणारे कॉंग्रेसचे हे रूप समाजाने विसरता कामा नये. बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजाच्या महिलांच्या स्थितीनुसार मोजावी.’’ आज या विधानाचा विचार करत, भाजप सरकारने ’बेटी बचाव बेटी पढाओ’, ’समृद्धी सुकन्या योजना’, ’उज्ज्वला योजना’ वगैरे महिलांच्या ‘माणूस’ म्हणून जगण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत. बाबासाहेबांनी एका ग्रंथात मुस्लीमस्त्रियांच्या हलाखीचे अतिशय वास्तवदर्शी, दुःखद वर्णन केले आहे. या भगिनींना न्याय मिळायलाच हवा असे त्यांचे मत होते. पण, हिंदू महिलांसबंधीचा कायदा धुडकावणारे कॉंग्रेस, मुस्लीममहिलांच्या न्यायासाठी काय विचार करणार? बाबासाहेबांचा विचार अग्रणी धरून, आज भारतीय जनता पार्टीने ‘तिहेरी तलाक’ या विषयाला न्याय देऊन, बाबासाहेबांनी मुस्लीमभगिनींची जी दुरवस्था मांडली, त्याला न्याय देण्याचे कामभाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. अहो बाबासाहेब म्हणाले होते, ’’मी प्रथमआणि अंतिमही भारतीय आहे.’’ या पार्श्वभूमीवर ’भारत तेरे तुकडे होंगे हजार’ असं याच मातीचे खाऊन याच मातीत राहणारा कन्हैय्या कुमार किंवा बाबासाहेबांनी ज्या संसदेला लोकशाहीचा आत्मा मानला त्या संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आंदोलन करणारा उमर खालीद आमच्या समाजाचा आदर्श होऊ शकतो का? तर नक्कीच नाही! ‘

आज जिंदगी फाईन है, कारण संविधानावर बाबासाहेबांची साईन आहे.’ जे कॉंग्रेस जे लाल बावट्यावाले संविधानाच्या, बाबासाहेबांच्या विरोधी विचार करतात, त्यांच्याशी समाजाने कसे वागले पाहिजे, हे बाबासाहेबांची भोळीभाबडी लेकरं असणार्‍या समाजाला सांगायची गरज आहे का? बाबासाहेब हुशार, बुद्धिमान होते, पण त्यांच्यातलं माणूसपण त्याहीपेक्षा मोठं होतं. समाजाचं कामकरणारा नेता कसा असावा? याचा विचार करताना मला बाबासाहेबांची ती घटना आठवते. बाबासाहेब ‘बाबासाहेब’ म्हणून उभ्या देशाला माहिती झाले होते. बाबांच्या राजगृहामध्ये एक मिटींग सुरू होती. मोठे मोठे दिग्गज नेते चर्चा करत होते. त्याचवेळी बाहेर एक फाटक्या कपड्यातला शेतकरी घामाघूमहोऊन, बाबासाहेबांना भेटण्यासाठी गावाहून पायी चालत मुंबईला आला होता. बाबासाहेब आपल्या भावकीतला हिस्सा आपल्याला मिळवून देऊन, तंटा मिटवू शकतात यासाठी तो आला होता. पण, त्याचा अवतार पाहून त्याला काही लोकांनी बाहेरच बसवले. बाबासाहेबांनी हे पाहिले. महत्त्वाची मिटींग सोडून ते आले. त्या थकल्या, भागल्या भुकेल्या शेतकर्‍याला पाणी-नाश्ता देऊन त्याची विचारपूस केली. त्याचे येण्याचे कारण विचारले. बाबासाहेब त्या गरीब शेतकर्‍याला म्हणाले, ‘‘बाबा कोर्टकचेरी, वकीलीत पैसे जाणार.’’ असे म्हणून बाबांनी त्याला चार युक्तीच्या गोष्टी सांगून, त्याला मदत केलीच, शिवाय त्याला परत गावी जाण्यासाठीही मदत केली. बाबा... बाबा... तुमचे हे माणूसपण किती अथांग आहे. ही जागरूक करूणा, ही सर्वव्यापी समरसता आमच्या मनात निर्माण होईल का? आज तुझ्या जयंतीला कुठे तरी वाचलेले मनात


उमटते-लहरे उठी ढेर समंदर नही हुआ

नेता तो कई हुए कलंदर नही हुआ

इतिहास गवाह है की

दुनिया मे फिर से बाबासाहेब जैसा कोई नही हुआ...



- योगिता साळवी
@@AUTHORINFO_V1@@