१५ वर्षीय अनिशने दिले देशाला १६ वे सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |





गोल्ड कोस्ट :  ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या आठव्या दिवशी भारताने सलग १६ सोळाव्या सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नेमबाजी प्रकारामध्येच भारताने हे सुवर्णपदक मिळवले असून भारताचा १५ वर्षीय खेळाडू अनिश भनवाला यानी हा सुवर्णवेध घेतला. २५ मी रॅपिड फायर पिस्तोल गटात अनिशने प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रकुलमधील सुवर्णपदकाचा तो मानकरी ठरला आहे.

दरम्यान आज सकाळीच महाराष्ट्राची मराठमोळी कन्या असलेल्या तेजस्विनी सावंत हिने देखील राष्ट्रकुल स्पर्धेतील ५० मी रायफल शुटींगमध्ये तेजस्विनीने प्रथम क्रमांक पटकावून देशाला एक सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तेजस्विनीबरोबच छत्तीसगडच्या अंजुम मौद्गील हिने देखील ५० मी रायफलमध्ये दुसरा क्रमांक पटकावून एक रौप्य पदक देशाला मिळवून दिले आहे. यामुळे भारताच्या खात्यात सध्या १६ सुवर्ण आणि ८ रौप्य पदके जमा झाली आहेत. 

रायफल शुटींगमध्ये झालेल्या सर्व सामन्यांमध्ये मिळून तेजस्विनीने एकूण ४५७.९ इतक्या गुणांची कमाई करून राष्ट्रकुल स्पर्धेत एक नवीन विक्रम नोंदवला आहे. तेजस्विनी पाठोपाठ अंजुम आणि त्यानंतर स्कॉटलँडची एस. मॅकिंटोश या दोघींनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.





राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आतापर्यंत शुटींग प्रकारा मध्ये भारताला सर्वाधिक सुवर्ण आणि रौप्य पदके मिळाली आहेत. वेगवेगळ्या शुटींग प्रकारामध्ये भारताला आतापर्यंत ६ सुवर्ण आणि ४ रौप्य अशी एकूण १० पदके मिळाली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@