‘न्यू इंडिया’ हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
दलितांसोबत काँग्रेसने नेहमी अन्याय केला आहे - नरेंद्र मोदी 
 
 
दिल्ली : ‘न्यू इंडिया’ हा जसा माझ्या स्वप्नातील भारत आहे तसाच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील देखील भारत आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज दिल्ली येथील २६ अलीपूर रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी ते जनतेला संबोधित करतांना बोलत होते. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे आज या राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
 
 
 
 
२०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार बनले आणि तेव्हापासून भारतात नवीन योजना आणि उपक्रम लागू होण्यास सुरुवात झाली असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जनता जेव्हा उत्तर मागेल त्या आधीच आपल्याला आपल्या कामाच्या स्वरुपात उत्तर तयार करून ठेवावे लागते असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आपण जनतेसाठी सत्तेत आलो आहोत त्यामुळे त्यांची सेवा करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
 
काँग्रेस सरकारने नेहमीच दलितांना मागे डावलले, त्यांनी दलितांचा समावेश राजकारणात होवू दिला नाही त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. ७० वर्ष झालेत तरी देखील अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाला घटनात्मक दर्जा काँग्रेसने दिला नाही. अजून देखील या आयोगावर संसदेत चर्चा झाली तरी काँग्रेस या चर्चेत बाधा निर्माण करतो अशी माहिती यावेळी नरेद्र मोदी यांनी दिली.
 
 
 
 
  
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत देखील काँग्रेसने राजकीय खेळी केली आहे असा आरोप यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. काँग्रेसने नेहमीच राजकीय खेळीच्या आधारावर सत्ता आपल्या हातात करून घेतली असाही आरोप त्यांनी यावेळी काँग्रेसवर केला आहे. मागील काही वर्षांमध्ये आम्ही देशाचा विकास करण्यास सुरुवात केली मात्र काँग्रेसने इतक्या वर्षांमध्ये काय केले? असा सवाल देखील त्यांनी यावेळी जनतेपुढे उपस्थित केला आहे. 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@