चंद्रपूरातील पाणी पुरवठा समस्‍येवर तोडगा काढण्‍यासाठी १७ एप्रिल रोजी उच्‍चस्‍तरीय बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील पाणी पुरठयाच्‍या समस्‍येवर उपाययोजना करण्‍यासाठी अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या विनंतीनुसार मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ एप्रिल रोजी मंत्रालयात उच्‍चस्‍तरीय बैठक बोलाविली आहे.
चंद्रपूर शहराला इरई धरणातुन होणा-या पाणी पुरवठयासंदर्भात उद्भवलेल्‍या अडचणी दुर करत शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा करण्‍यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विनंतीनुसार आयोजित सदर बैठक १७ एप्रिल रोजी मंत्रालयात आयोजित करण्‍यात आली आहे.
मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणा-या या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ. नानाजी शामकुळे, चंद्रपूर जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल, चंद्रपूरच्‍या महापौर अंजली घोटेकर, स्‍थायी समिती सभापती राहूल पावडे, महापालिका आयुक्‍त, चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे मुख्‍य अभियंता, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती राहणार आहे.
चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठयाच्‍या समस्‍येच्‍या पार्श्‍वभूमीवर आयोजित सदर बैठक अतिशय महत्‍वाची मानली जात आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@