700 रुपयांची लाच स्विकारतांना महिला तलाठी जाळयात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
700 रुपयांची लाच स्विकारतांना महिला तलाठी जाळयात
जळगाव, 13 एप्रिल
मालमत्तेला वारस लावण्यासाठी 700 रुपयांची लाच स्विकारतांना वाडी ता.पाचोरा येथील महिला तलाठयास अॅन्टी करप्शन ब्युरोने 13 रोजी रंगेहाथ पकडले आहे.
 
 
तक्रारदार पुरूषाने त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेला वारस लावण्याच्या मोबदल्यात तलाठी पुनम वरकड यांनी 700 रुपयांच्या लाचेची मागणी 2 एप्रिल रोजी केली होती. याबाबत तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरो जळगाव यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. या तक्रारीची शहानीशा करून 13 रोजी जी.एम.ठाकुर पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि. जळगाव यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला. लाच स्विकारतांना आरोपीस रंगेहात पकडण्यात आले आहे. याबाबत आरोपी पुनम वरकड व मधुकर चुडामण पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
@@AUTHORINFO_V1@@