अग्निशमन सेवा दिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
 अग्निशमन सेवा दिन
जळगाव, 13 एप्रिल
* अनेक आस्थापनांमध्ये अग्निशमन दल नाही
* गर्दिच्या ठिकाणी प्रशासनाची व्यवस्था नाही
* अनेक ठिकाणी अग्निशमन व्यवस्था मोडकळीस आलेली
 
 
14 एप्रिल हा अग्निशमन दिवस म्हण्ून साजरा केला जातो. या अंतर्गत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.या निमित्ताने अग्नीशमन कर्मचा­यांच्या सेवा आणि समस्या समोर येत असतात.
 
 
14 एप्रिल 1944 रोजी व्हिक्टोरीया डॉक मुंबई पोर्ट ट्रस्ट, मंंबई येथे स्फोटक वाहून आणणा­या जहाजास आग लागली होती ही आग इतकी मोठी होती कि, ती विझवित असतांना मंबई अग्निशमन दलाचे जवान व काही अधिकारी शहिद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ संपुर्ण भारतात अग्निसेवा दिन व सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहात अग्निशमन दलाचे जवान जनतेस प्रात्यक्षात प्रशिक्षण देतात व शहिद जवानांना श्रध्दांजली वाहतात.खाजगी आस्थापनांमध्ये सुध्दा हा दिवस पाळण्यात येतो व सहका­यांना प्रशिक्षण देण्यात येते.
 
 
प्रत्यक्षात पाहिले तर आग लागणे ही अप्रिय घटना आहे. त्यात होणा­या हानिचा अंदाज लावता येत नाही. अनेक शासकिय आस्थापनांमध्ये आजही अग्निशमन दल नाही. जेथे आहे तेथे प्रशिक्षीत कर्मचारी नाहीत. या विभागाबाबत केंद्र व राज्य सरकार विशेष दक्ष असल्याचे दिसत नाही.सुमारे दोन वर्षांपुर्वी भुसावळ येथील रेल्व्ेच्या एमओएच शेडमधील वेस्टेज मटेरीयल ला लागलेली आग विझविण्यास अनेक दिवस लागले. येथे रेल्वेचे स्वत:चे अग्निशमन दल नसल्याचे समोर आले होते. तसेच शहरात अनेक ठिकाणी लागलेल्या आगीवरून अनेकदा मनुष्याच्या निष्काळीपणमुळे आग लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.आग लागण्याचे अनेक कारणे असली तरी लोकांमध्ये याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे.
 
 
सरकारने सर्व अग्निशमन दलामध्ये अत्याधुनिक साहित्य , अग्निशमन बंब व प्रशिक्षीत जवान जास्तीजास्त असावे. जेणे करून मालमत्तेचे होणारे नुकसान वाचविता येईल.- सागर किशोर बागुल, अग्निशमन जवान जळगाव
 
@@AUTHORINFO_V1@@