सिरियाप्रश्नी सर्व देशांनी एकत्र यावे : ब्रिटेन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |


लंडन : गेल्या अनेक वर्षांपासून युद्धाच्या झळा सहन करणाऱ्या सिरीयासाठी आता सर्व देशांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याचे आवाहन ब्रिटेनने केले आहे. याचसंबंधी नुकताच ब्रिटेनने आपल्या संसदेत एक प्रस्ताव देखील पारित केला असून यात सिरीयामध्ये सुरु असलेला हिंसाचार आणि रक्तपात थांबवण्यासाठी आता ब्रिटेन देखील पुढाकार घेईल, असे ब्रिटेन संसदेने मान्य केले आहे. तसेच सर्व देशांनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ब्रिटेन संसदेने केले आहे.

ब्रिटेनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या संबंधी संसदेत एक प्रस्ताव मांडून, त्यामध्ये सिरियातील परिस्थितीकडे संसदेचे लक्ष वेधले. यामध्ये सिरीयात होत असलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्या आणि मानवाधिकारांचे होत असलेले हनन यावर त्यांनी संसदेत आपले मत मांडले व यासाठी आता ब्रिटेनने देखील पुढाकर घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर सभागृहातील अनेक नेत्यांनी देखील आपली बाजू मांडत, सिरियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटेन पुढाकार घेण्यास तयार असल्याचे संसदेने मान्य केले. तसेच वेळ पडल्यास सिरियामध्ये अमेरिकेसह सैन्य कारवाई देखील करण्यास देखील ब्रिटेन तयार असेल असे संसदेने मान्य केले. यानंतर ब्रिटेन पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या आपल्या वक्तव्यामध्ये सर्व देशांनी देखीलयासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@