डॉ. सुधाकर शिंदे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |

पनवेल महापालिकेचा विशेष महासभा ठराव केला अमान्य
 ठराव पनवेलकरांच्या हिताविरूद्ध असल्याचा सरकारचा शेरा !
 
 

 
 
मुंबई : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यामागे राज्य सरकार खंबीरपणे उभे राहिले असल्याचे चित्र दिसत असून पनवेल महानगरपालिकेने मांडलेला शिंदे यांच्या निलंबनाचा विशेष महासभा ठराव राज्य सरकारने निलंबित केला आहे.
 
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार, पनवेल महापालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी प्रशासकीय शैथिल्य, भ्रष्टाचार, महापालिकेचे आर्थिक नुकसान आदी कर्तव्य कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. आयुक्तांकडे प्रशासन, विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम, मूलभूत सुविधा पुरवणे, आदी काम सोपवण्यात आले असून पनवेल महापालिकेने मांडलेल्या निलंबनाच्या ठरावामुळे या कामाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
 
तसेच, हा ठराव पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या व्यापक लोकहिताविरूद्ध असल्याची टिप्पणीही राज्य सरकारने केली आहे. डॉ. सुधाकर शिंदे हे नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेचे पहिले आयुक्त आहेत. मात्र, दि. २६ मार्च रोजी पनवेल महापालिकेने विशेष महासभा आमंत्रित करून डॉ. शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागाने हा ठराव साफ फेटाळला आहे. यामुळे, पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यामागे मुख्यमंत्री फडणवीस खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@