सदनिकानिहाय मालमत्ता कर बील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |

महापालिकेचा नागरिकांना दिलासा

 
 
 
 
मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण सोसाट्यांमधील सदनिकाधारकांना पालिका स्वतंत्र मालमत्ता कर बील देणार आहे. १ एप्रिल २०१८ रोजी किंवा त्यानंतर 'भोगवटा प्रमाणपत्र' मिळणाऱ्या सर्व इमारतींना हा नियम लागू होईल, अशी माहिती अतिरिक्त संजय मुखर्जी यांनी दिली. त्यानुसार १ एप्रिल २०१८ पासून 'भोगवटा प्रमाणपत्र' मिळणाऱ्या नव्या इमारतींमधील सदनिका धारक वा गाळेधारेकांना त्यांचे मालमत्ता-कर त्यांच्या नावासह व स्वतंत्रपणे मिळणार आहे. पालिकेच्या निर्णयामुळे सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान इमारतींवर मालमत्ता किंवा सहकारी सोसायट्यांवर कर आकारला जात होता. परंतु, सोसायटीमधील अंतर्गत बाबींमुळे मालमत्ता कर पालिकेकडे जमा करण्यास अडचणी येऊ लागल्याने महापालिकेने आता सर्वच नवीन इमारतींमधील सदनिका वा गाळेधारक यांना त्यांच्या नावासह स्वतंत्र मालमत्ता कर बील पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
जर एखाद्या गृहनिर्माण सोसायटीतील काही सदनिकाधारकांनी कर भरण्यास विलंब केला तर महापालिका त्या सोसायटीला नोटीस बजावते. तसेच दंड आकारला जातो किंवा जलजोडणी खंडित केली जाते. परंतु त्यामुळे नियमित कर भरणार्‍या सदनिकाधारकांना याचा त्रास होतो. हे प्रकार थांबवण्यासाठी सदनिकानिहाय करआकारणी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी केली होती. पालिका प्रशासनाने याची दखल घेत, सदनिकाधारकांना स्वतंत्र देयक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार १ एप्रिल २०१८ रोजी किंवा त्यानंतर 'भोगवटा प्रमाणपत्र' मिळणा-या सर्व इमारतींना हा नियम लागू होईल, अशी माहिती अतिरिक्त संजय मुखर्जी यांनी दिली. तसेच नवीन सोसायटी व विकासक यांच्यामध्ये मालमत्ता करावरुन अनेकदा वाद होतात. त्यामुळे आता नव्या इमारतींमधील विकल्या न गेलेल्या सदनिका वा गाळ्यांचा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी संबंधित बिल्डरांची तर विक्रीनंतर मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी संबंधित सदनिका / गाळेधारकांची असेल, मुखर्जी यांनी सांगितले. या निर्णयाबाबत प्रशासकीय परिपत्रक जारी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
 
एक लाख ४२ हजार सदनिकाधारकांची 'ना हरकत'
 
महापालिका परिसरात सध्या सुमारे २ लाख ७५ हजार करपात्र इमारती आहेत. यापैकी सुमारे २८ लाख सदनिका व गाळे आहेत. या २८ लाख सदनिका / गाळ्यांपैकी साधारणपणे एक लाख ४२ हजार सदनिकाधारकांनी /गाळेधारकांनी आपल्या मालमत्ता कराची स्वतंत्र बिले महापालिकेकडे अर्ज व सोसायटीचे 'ना हरकत' घेऊन करवून घेतली आहेत. तर उर्वरितांना नवीन धोरणानुसार १ एप्रिल २०१८ पासून नव्या इमारतींमधील सदनिकाधारकांना किंवा गाळेधारकांना स्वतंत्र मालमत्ता कराची बील मिळणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@